*लातूर जिल्ह्यातील गोगलगायीच्या
नुकसानी संदर्भात*
*पीक विमा कंपनीकडून नुकसान
भरपाईसाठी जिल्हाधिकारी यांचा अध्यादेश*
*लातूर दि.17(जिमाका):-* लातूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये पेरलेल्या पिकावर
माहे जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानी संदर्भात
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या तरतुदीनुसार हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती (Mid Season Adversity) याबाबी अंतर्गत संयुक्त सर्वेक्षण करून नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या 25 टक्के रक्कम देण्याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आदेश जारी केलेला आहे,
असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले
आहे.
****
Comments
Post a Comment