हुतात्मा स्मारक
लातूर येथे भरले मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याच्या दुर्मिळ छायाचित्राचे आणि पुस्तकाचे
प्रदर्शन ; राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले उदघाट्न
▪ मराठवाडा मुक्ती
लढ्यातील सचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची गर्दी
लातूर दि.17 (जिमाका) मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात आज पासून झाली. त्यानिमित्ताने हा ज्याज्वल्य इतिहास नागरिकांना कळावा म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या संकल्पनेतून जिल्हा ग्रंथालयाने मराठवाडा मुक्ती संग्राम काळातील अत्यंत दुर्मिळ अशा फोटोचे प्रदर्शन तसेच पुस्तकाचे प्रदर्शन हुतात्मा स्मारक, येथे आयोजित केले आहे. त्याचे उदघाटन कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर महानगर पालिकेचे आयुक्त अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, उपस्थित होते.
प्रदर्शनात काय
काय आहे
या प्रदर्शनामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील महत्वाचे प्रसंग, स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे स्वातंत्र्य सैनिक यांचा परिचय, त्या काळातील दैनिक नियतकालिकात आलेल्या बातम्या, लेख,
13 सप्टेंबरच्या पहाटे पासून सुरु झालेल्या पोलिस कारवाई म्हणजे ऑपरेशन पोलोचे
अत्यंत दुर्मिळ फोटो इथे माहितीसह प्रदर्शीत करण्यात आले आहेत.
मराठवाडा मुक्ती
संग्रामात लातूरचे योगदान
या प्रदर्शनात मराठवाडा मुक्ती संग्रामात मोठे योगदान राहिले आहे. त्या महत्वाच्या घडामोडीची चित्ररूपात मांडणी केली आहे. लातूरच्या गंजगोलाई वर 1947 साली निजामाच्या पोलिसांना चकवा देऊन मोठ्या धाडसांनी स्वातंत्र्य सैनिकांनी तिरंगा फडकवला होता. त्या ठिकाणाचा दुर्मिळ फोटोही या प्रदर्शनात आहे.
या प्रदर्शनातील
हे दुर्मिळ फोटो,त्याकाळातील पेपर कात्रणे
इतिहास अभ्यासक भाऊसाहेब उमाटे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, साहित्यिक विवेक सोताडेकर,इतिहासाचे
प्राध्यापक आणि अभ्यासक प्रा.सुनील पुरी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्या
सौजन्याने प्राप्त झाले. हे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे आणि त्यांच्या
टीमने अत्यंत मेहनतीने उभे केले आहे. या सर्वांचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कौतुक
केले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनीही हे प्रदर्शन अधिकाधिक लोकांनी पहावे
असे आवाहन केले आहे.
****
Comments
Post a Comment