सेवा पंधरवडा मोहिमेतंर्गत अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन

 

सेवा पंधरवडा मोहिमेतंर्गत

अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन

          *लातूर दि.19(जिमाका)* राज्‍यातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न वाढवून त्‍यांचे जीनवमान उंचावण्‍यासाठी शासनाच्‍या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविण्‍यात येत आहेत. तथापि सदर प्रवर्गातील शेतकरी आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत तसेच या प्रवर्गातील बरेच शेतकरी दुर्गम भागात रहात असल्‍याने त्‍यांचेपर्यंत योजनांची माहीती विविध माध्‍यामाद्वारे पोहोचण्‍यास  मर्यादा आहेत. त्‍यामुळे त्‍यांचा योजनांमधील सहभाग कमी राहतो. परिणा‍मी सदर प्रवर्गासाठी योजनांतर्गत प्राप्‍त निधी पुर्णपणे खर्च करण्‍यास अडचणी निर्माण होत आहेत.

              याअनुषंगाने या प्रवर्गातील शेतकरी बांधवांना कृषि विभागाच्‍या योजनांची माहीती होणेसाठी तसेच विविध योजनांमधील सहभाग वाढविणेसाठी व्‍यापक स्‍वरूपात प्रचार व प्रसिध्‍दीसाठी दि. १७ सप्टेंबर २०२२ ते दि. ०२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत संपूर्ण राज्‍यात कृषि सामाजिक समावेशन सेवा पंधरवडा मोहीम स्‍वरूपात सादर करावयाचा आहे.

         सन २०२०-२१ पासून कृषि विभागाच्‍या योजनांची महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करण्‍यास शासन मान्‍यता देण्‍यात आली आहे. यामध्‍ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृ‍षि स्‍वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) या योजनांचा समावेश आहे. त्‍यानुसार स्‍वीकृतीपासून लाभार्थ्‍यांना अनुदान अदा करण्‍यापर्यंतची प्रक्रिया सुरू आहे.

          उपरोक्‍त योजनांतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी नवीन विहीर, जूनी विहीर दुरूस्‍ती, पंपसंच, वीज जोडणी, ठिबक सिंचन संच / तुषार सिंचन संच. इनवेल बोरिंग सोलार पंप, डिजेल इंजिन इ.घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर online अर्ज ग्रामस्‍तरावरील आपले सरकार सेवा केंद्र, सामुदायिक सेवा केंद्रातुन दाखल करावेत, असे अवाहन कृषि विकास अधिकारी सुभाष चोले  जि.प.लातूर यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा