राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना मुरुडमध्ये पोषण माह कार्यक्रम
राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना
मुरुडमध्ये पोषण माह कार्यक्रम
*लातूरदि.8(जिमाका)* महिला व बालकल्याण विभाग लातूर व एकात्मिक बाल विकास प्रकल्प मुरुड व लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतामणी मंगल कार्यालय मुरुड येथे राष्ट्रीय पोषण माह 2022 कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व प्रमुख उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर अभिनव गोयल व उप मुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती माळी जे.डी. यांनी केले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी उपस्थित महिलांना बालकुपोषण नष्ट करून देश बलवान बनवणे विषयी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अभिनव गोयल यांनी पोषण माह जिल्ह्यात योग्य रितीने राबविण्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उप मुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व इतर सर्व विभागांनी पोषण माह अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे असे सांगितले.
या कार्यक्रमामध्ये पोषण आहार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. अन्न प्राशन ,पंजिकरण आदी उपक्रम देखील मान्यवरांचे हस्ते घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी Vstf चे जिल्हा कार्यकारी विनायक तौर विस्तार अधिकारी तसेच मुरुड व विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका अ.वाडी सेविका मदतनीस व इतर महिला यांची उपस्थिती होती.
****
Comments
Post a Comment