केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड* *यांचा लातूर जिल्हा दौरा*
*केंद्रीय
वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड*
*यांचा लातूर
जिल्हा दौरा*
*लातूरदि.9(जिमाका)* केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
हे शनिवार, दिनांक 10 सप्टेंबर, 2022 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.
शनिवार,
दिनांक 10 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 11-30 वाजता दगडवाडी किनगाव तालुका अहमदपूर जि.
लातूर येथे श्री. सुभाष धोंडीबा मुंडे ( उपसरपंच दगडवाडी) यांच्या निवासस्थानी भेट.
दुपारी 12-30 वाजता तालुका अहमदपूर जि. लातूर येथे लिंगायत समाज भक्तीस्थळ येथील कार्यक्रमास
उपस्थिती. दुपारी 1-30 वाजता अहमदपूर येथील बँक कॉलनी येथे प्रदेश प्रवक्ते श्री. गणेशजी
हाके यांच्या निवास्थानी राखीव. दुपारी 2-30 वाजता अहमदपूर येथील श्री बसवेश्वर चौक
येथील डॉ. अशोक सांगवीकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 3-15 वाजता महात्मा
गांधी महाविद्यालय येथे सदिच्छा भेट. दुपारी 4-30 वाजता भारतीय जनता पार्टी पदाधिकारी
यांची बैठक ( माजी आमदार विनायकराव पाटील, अशोक केंद्रे) .
****
Comments
Post a Comment