अधिकारी / कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी पात्र, अपात्रतेची व जेष्ठता सुची जि.प. च्या संकेतस्थळावर उपलब्ध

 

अधिकारी / कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी पात्र, अपात्रतेची व जेष्ठता सुची

जि.प. च्या संकेतस्थळावर उपलब्ध

*कार्यालय प्रमुखामार्फत 20 सप्टेंबर पर्यंत अक्षेप हरकती असल्यास  सा.प्र. विभागाला सादर करावेत

लातूर, दि.16(जिमाका):- जिल्हा परिषद लातूर अंतर्गत सर्व विभागांतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गातील सन 2022 मध्ये पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 अधिकारी / कर्मचारी यांची पदोन्नतीसाठीची पात्र / अपात्रतेबाबतची यादी / जेष्ठतासुची तयार करण्यात आलेली आहे. व सदर यादी जिल्हा परिषद लातूरच्या www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती सर्व कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

सदरची यादी  जेष्ठतासुची सर्व संबंधीत विभाग प्रमुख व सर्व गटविकास अधिकारी पंचायत समिती जि. लातूर यांच्या मार्फत संबधीत अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देऊन व अधिकारी, कर्मचारी यांच्या कडून दिनांक 20 सप्टेंबर, 2022 पर्यंत आक्षेप,  हरकती मागविण्यात आलेल्या आहेत.

तरी पदोन्नतीबाबत सदर यादी, जेष्ठतासुची बाबत काही आक्षेप, हरकती असल्या अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे कार्यालय प्रमुखामार्फत दि. 20 सप्टेंबर, 2022 पुर्वी सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) नितीन दाताळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                               0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा