समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर यांच्या मार्फत सेवा पंधरवाडा अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृध्द दिवस साजरा करण्याचे आवाहन
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर यांच्या मार्फत सेवा पंधरवाडा अंतर्गत
1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृध्द दिवस साजरा करण्याचे आवाहन
*लातूर,दि.28(जिमाका):-*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्तीसंग्राम
अमृत महोत्सव निमित्ताने दि. 1 ऑक्टोबर, 2022 रोजी जागतिक वृध्द दिवस साजरा करण्याच्या
अनुषंगाने सेवा पंधरवाडा निमित्त लातूर जिल्ह्यातील
शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार व उचित सन्मान करणेसाठी तालूका स्तरावर
व ग्राम पंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
शहरी
भागातील व ग्रामीण भागातील जेष्ठ नागरीकांचे शासकीय दवाखाणे,
ग्रामीण
रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये मोफत तपासणी जसे की,
रक्तदाब,
मधुमेह
व मोती बिंदू इ.तपासणी
केली जाणार आहे. गाव पातळीवर जेष्ठ नागरीकांसाठी अत्यावश्यक
वस्तूचे वाटप करण्याच्या सूचना गट विकास
अधिकारी यांना दिलेल्या आहेत. तसेच जागतिक वृध्द दिनानिमित्त गट स्तरावर जेष्ठ नागरिकांसाठी
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत
समितीमार्फत ग्रामपंचायतीमध्ये जेष्ठ नागरिकांना बोलावून त्यांचा उचित सन्मान व सत्कार केला जाणार आहे.
प्रत्येक
गावामध्ये जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करणे व उध्दघाटन कार्यक्रम
राबविण्यात येणार आहे. तसेच
गावातील प्राथमिक/ माध्यमिक शाळा,
माध्यमिक
व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जेष्ठ नागरिकांना बोलावून त्यांचा उचित सन्मान व सत्कार
करुन त्यांचे वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांसमोर
व्याख्यान रुपाने सादरीकरण केले जाणार असल्या बाबतची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी दिली. तसेच कार्यक्रमाचा लाभ लातूर जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरीकांनी घ्यावा असे अवाहन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव व मुख्य कार्यकारी
अधिकारी अभिनव गोयल, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे
केले आहे.
***
Comments
Post a Comment