स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्ताने दि.17 सप्टेंबर, 2022 ते दि. 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये *जिल्ह्यात सेवा पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा
मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्ताने
दि.17 सप्टेंबर, 2022 ते दि. 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये
*जिल्ह्यात सेवा पंधरवाडा निमित्त विविध
कार्यक्रमांचे आयोजन
*लातूर,दि.24(जिमाका):-*
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सेवा पंधरवाडा साजरा करणे बाबत स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर
2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला असून हे
अंतर्गत खालील प्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक कार्यक्रमाचे
स्वरूप व कार्यक्रमाचा स्तर पुढील प्रमाणे राहील.
दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हास्तरावरावर दिव्यांग
लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत अनुदान धनादेश वितरण करणे.
तसेच जिल्हा व तालुकास्तरावर दिनांक 23 सप्टेंबर, 2022 शासन निर्णय दि. 15 सप्टेंबर
2022 अन्वय जागतिक सांकेतिक भाषा दिन साजरा करणे. दिनांक 29 सप्टेंबर 2022 जिल्हास्तरावर
निवासी मूकबधिर विद्यालय लातूर येथे सर्व कर्णबधिर शाळांच्या सहभागाने जागतिक कर्णबधिर
दिन साजरा करणे . दिनांक 27, 28 व 29 सप्टेंबर, 2022 या कालावधीत तालुकास्तरावर इयत्ता
पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनांचे
प्रस्ताव संकलन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 30 सप्टेंबर, 2022 रोजी तालुकास्तरावर
अनुदानित वस्तीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 29 व 30 सप्टेंबर
2022 ते दि. 1 ऑक्टोबर, 2022 रोजी
तालुकास्तरावर आरोग्य विभागाच्या साह्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
करणे.
या पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत आज दिनांक 23 सप्टेंबर
2022 रोजी एकूण 12 दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत
अनुदान धनादेश वितरण करण्यात आले. सदर योजनेमुळे बेरोजगार दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा
उद्योग व्यवसाय उभारून स्वयंरोजगार निर्मिती होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मूकबधिर
प्रवर्गाच्या विशेष शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जागतिक सांकेतिक भाषा
दिन साजरा करण्यात आला
या कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर
सहाय्यक लेखा अधिकारी सुनील जोशी समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय कुंभार दिव्यांग कल्याण
विभागाचे सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे व वरिष्ठ लिपिक शाहूराज कांबळे इत्यादी
मान्यवर उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment