महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),लातूर महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या जास्तीत जास्त बँक कर्जाचा वापर हा उद्योगासाठी करावा-सिद्धाराम माशाळे § जयहिंद लोकसंचलित साधन केंद्र लातूर ची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

 

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),लातूर

 

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या

जास्तीत जास्त बँक कर्जाचा वापर हा उद्योगासाठी करावा-सिद्धाराम माशाळे

 

§      जयहिंद लोकसंचलित साधन केंद्र लातूर ची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

 


*
लातूर, दि.10 (जिमाका):-* महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या जास्तीत जास्त बँक कर्जाचा वापर हा उद्योगासाठी वापर करावा व बचत गटांनी आता फक्त बचत गट म्हणून मर्यादित न राहता उत्पादक व व्यवसायिक गट म्हणून पुढे आले पाहिजे. तसेच माविम मार्फत राबविण्यात येत असलेल्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत लोकसंचलित साधन केंद्रा मार्फत सुरू करण्यात येणार्‍या विविध उप उपप्रकल्पात सहभाग घेऊन आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करावी असे मत माविम चे मराठवाडा विभागाचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी श्री सिद्धाराम माशाळे यांनी व्यक्त केले.


नुकताच महादेव पार्वती मंगल कार्यालय लातूर येथे माविम लातूरअंतर्गत स्थापन केलेल्या जयहिंद लोकसंचलित साधन केंद्र लातूर ची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी त्यांनी महिलाना नवतेजस्विनी कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.

सभेच्या अध्यक्ष स्थानी साधन केंद्राच्या अध्यक्षा सौ कोमल भारती या होत्या. या वेळी मंचावर नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री प्रमोद पाटील, बँक ऑफ महाराष्ट्राचे जिल्हा समन्वयक राजू बागवान, डॉ. योगिनी थोरात, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी मन्सूर पटेल, सहा. जिल्हा समन्वय अधिकारी दीपक टेकाळे, लेखाधिकारी परमेश्वर इंगळे, स्ट्रेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण केंद्राचे व्याख्याते सतीश कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सभेकरीता लातूर शहर व परिसरातील 26 गावातील बचत गटातील जवळपास 1 हजार 200 महिलांची उपस्थिती होती.

           


या वेळी नाबार्ड चे चे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील यांनी नाबार्ड द्वारा 1998 साली देशात बचत गटाची (SHG) स्थापना करण्यास सुरू केली होती ती आज देशात मोठी चळवळ उभी राहिली. आज भारतात एक कोटी एकोणवीस लाख बचत गट स्थापना झालेले असून त्यात 14 कोटी कुटुंब समाविष्ट झाले आहेत. या बचत गटामार्फत आज विविध बँका कडे चौदा हजार कोटी ठेवी ठेवली गेली आहेत तर 1 लाख 51 हजार कोटी कर्ज बचत गटाने घेतली आहेत आणि ही जगात सर्वात मोठी मायक्रोफायनान्स चळवळ असल्याचे सांगून आपल्या देशात बचत गटाचे कर्ज  एनपीए (NPA) होण्याचे प्रमाण 3.5 टक्के असून महाराष्ट्रात 9 टक्के तर लातूर जिल्ह्याचे 12 टक्के प्रमाण असल्याचे संगितले. त्यात माविमच्या बचत गटाचे कर्ज परतफेडीची प्रमाण 99 टक्के असल्याने माविम व लोकसचलीत साधन केंद्राच्या कामाचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.


बँक ऑफ चे जिल्हा समन्वयक राजू बागवान यांनी माविम व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामध्ये सामंज्यस्य करार करण्यात आलेले असून लोकसंचलित साधन केंद्राने बँक कर्जाकरिता बचत गटांचे प्रस्ताव बँकेकडे सादर करावेत. त्याला लवकरात लवकर बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे सगीतले,


या वेळी डॉ.योगिनी थोरात यांनी महिलाना त्यांच्या आरोग्य व महिलांचे त्यांच्या कुटुंबातील योगदान याबाबत मार्गदर्शन करून महिलांनी त्यासोबत बचत गटाच्या माध्यमातून करत असलेले काम व त्यातून निर्माण केलेली स्वत: ची ओळख याबाबत कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले.

माविमचे जिल्हा समन्वय अधिकरी मन्सूर पटेल यांनी माविमअंतर्गत जिल्ह्यातील बचत गटांच्या कामाची माहिती देवून बचत गटाच्या पंचसूत्री चे महत्व सांगून बचत गटांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करून आपली पत कायम ठेवावी असे संगितले.


सतीश कांबळे यांनी स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण केंद्रामार्फत महिलाना विविध प्रकारचे मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचा महिलांनी लाभ घ्यावा असे अवहान केले. सभेच्या शेवटी अध्यक्ष सौ. कोमल भारती यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार व्यक्त केले.


या सभे दरम्यान जयहिंद लोकसचलित साधन केंद्राच्या 2021-22 या वर्षाच्या कार्य अहवाल पुस्तकाचे मान्यवारांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. उत्कृष्ट कार्य केलेल्या समुदाय संसाधन व्यक्तीचे (CRP), उद्योजक महिलांचे व ग्राम सघाचे मान्यवरांच्या हस्ते सनमांचिन्ह व पुष्गुछ देवून गौरव करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र द्वारा 5 महिला बचत गटाला तर ICICI बँक द्वारा 3 महिला बचत गट असे एकूण 8 बचत गटाला एकूण 20 लाख 40 हजार रु कर्ज मंजूरी पत्र मान्यवरच्या हस्ते वाटप करण्यात आले. वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान एकूण 5 महिला बचत गटांनी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तु व मालाचे स्टॉल लावण्यात आले त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला व मालाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. लोकसचलित साधन केंद्रातील सर्व कार्यरत कर्मचारी चे उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व लोकसंचलित साधन केंद्राने वर्ष 2021-22 मध्ये केलेल्या कामाचे कार्य अहवाल व पुढील वर्षाचे नियोजन या बाबत ची मांडणी साधन केंद्राचे व्यवस्थापक श्रीमती सविता पाटील यांनी केली.

सभेचे सूत्रसंचालन माविम चे सहा. संनियत्रण अधिकारी सूर्यकांत वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुमित्रा बहिर यांनी केले.

सभा यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकारणी सदस्य, सर्व सीआरपी (CRP), लेखापाल विजय लोंढे, सहयोगिनी नागाबाई कांबळे, मीरा कांबळे, सुलक्षणा माटे, स्मिता पाडूळे, शोभा घोलप, वाहन चालक सुरेंन्द्र कांबळे यांनी परिश्रम घेतले.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा