17 सप्टेंबर,2022 ते 2 ऑक्टोबर,2022 या कालावधीत सेवा कर्तव्यपथ पंधरवडा

 

17 सप्टेंबर,2022 ते 2 ऑक्टोबर,2022 या कालावधीत सेवा कर्तव्यपथ पंधरवडा

 

जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीर*

 

*लातूर,दि.24(जिमाका):-* सामाजिक न्याय विभागामार्फत दि. 17 सप्टेंबर, 2022                                            ते दि. 2 ऑक्टोबर,2022 या कालावधीमध्ये सेवा कर्तव्यपथ पंधरवडा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त  राज्यातील जेष्ठ नागरीकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थांच्या सहाय्याने दि. 17 सप्टेंबर,2022 ते दि. 2 ऑक्टोबर,2022 या कालावधीमध्ये विशेष शिबीराचे आयोजन करण्याबाबत  शासनाने निर्देश दिलेले आहेत.

पुणे समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, आयुक्त  डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या मार्गदर्शनातून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर या कार्यालयामार्फत दि. 21 सप्टेंबर, 2022 रोजी लातूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच जागतिक स्मृतिभ्रंश दिनानिमित्त प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मृतिभ्रंश या आजाराबाबत समुपदेशन करण्यात आले.

            विवेकानंद रुग्णालय व अपोलो रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर व इतर कर्मचारी  यांचे मार्फत जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर शिबीरात 46 जेष्ठ  महिला व पुरुष यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली व योग्य औषधोपचार करण्यात आला. ज्या जेष्ठांना गंभीर आजाराचा त्रास असेल तर त्या आजारावर औषधोपचार व योग्य वैदयकिय उपचाराबाबत सल्ला देण्यात आला. तसेच  डॉ. संतोष देशपांडे आणि डॉ. सुधा राजुरकर यांनी स्मृतीभृंश या आजारावर सविस्तर मार्गदर्शन केले.

              या  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मातोश्री वृद्धाश्रम समितीचे अध्यक्ष डॉ. महेश देवधर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी आर पाटील, रवी गडेकर, सहाय्यक आयुक्त एस.एन. चिकुर्ते, तसेच श्री अधीक्षक मती. लाखाडे आशा तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक राम शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेश जाधव यांनी केले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु