ज्या शेतकऱ्यांचे पिक नुसान झालेले आहे* *त्यांनी क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲपवर सुचना नोंदवावी**-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी*
*ज्या शेतकऱ्यांचे
पिक नुसान झालेले आहे*
*त्यांनी क्रॉप
इन्शुरन्स मोबाईल ॲपवर सुचना नोंदवावी*
*-जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी*
*लातूरदि.9(जिमाका)* क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप (गुगल) प्ले स्टोअर वर उपलब्ध असून मराठी भाषेमध्ये माहिती भरता येणे शक्य
असल्याने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे यांनी प्राधान्याने अॅपद्वारे
नुकसानीची सूचना नोंदवावी व अधिक माहितीसाठी जिल्हा प्रतिनिधी,भारतीय कृषी विमा कंपनी संतोष भोसले, (मो.9370950044)
नजीकच्या तालुका विमा कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये
मागील काही दिवसापासून सर्व दूर पाऊस होत आहे. सध्या खरीप पिके शेतात उभी आहेत. सततच्या पाऊसामुळे काही महसूल
मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक
नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्सखलन, गारपीट, ढगफुटी अथवा
वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर
पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.
यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीची पूर्वसूचना प्रथम प्राधान्याने क्रॉप
इन्शुरन्स मोबाईल ॲपद्वारे देण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना व्यक्तीश: अर्ज
कागदपत्रे द्यावे लागणार नाहीत. अॅपद्वारे दिलेल्या
अर्जांची पुष्ठी करून संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे डॉकेट आय.डी. मिळेल
ज्याद्वारे शेतकऱ्यांना अर्जाची सद्यस्थिती अॅपद्वारे पाहता येईल.
मोबाईल ॲपद्वारे शक्य न झाल्यास काही
अडचण असल्यास भारतीय कृषी विमा कंपनी टोल फ्री क्रमांक 18004195004 या
क्रमांकावर फोन करुनही आपली पिक नूकसानीची
तक्रार नोंदविणे शक्य आहे. सदर आपत्तीची
माहिती तालुका स्तरावर कार्यन्वित असलेल्या तालुका विमा कार्यालयात पण देता येईल.
Comments
Post a Comment