जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

 

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

 

            *लातूर,दि.13(जिमाका):-*सन 2022-23 या शैक्षणिक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक  प्रवेश प्रक्रियेच्या मध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ  इच्छीणाऱ्या मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, सन 2022-23 या वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छूक असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइेन अर्ज तात्काळ समितीकडे सादर करावे.

            शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाले असल्याने चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला नाही त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा व त्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या सांक्षांकित प्रती जोडून  ज्या जिल्हातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावेत. जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांस आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास  जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही. असे हमीपत्र अर्जदाराने आर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताहणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सदर हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, लातूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

 

                                                                0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा