17 सप्टेंबर ते 2 आक्टोबर, 2022 या कालावधीत "सेवा पंधरवाडा" मोहीम तालुका स्तरावर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची कार्यशाळा, सेवा पंधरवाडा मोहिमेच्या माध्यमातून कृषि विभागाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा कृषी विभागाचे आवाहन

 17 सप्टेंबर ते 2 आक्टोबर, 2022 या कालावधीत "सेवा पंधरवाडा" मोहीम  

तालुका स्तरावर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची कार्यशाळा, 


सेवा पंधरवाडा मोहिमेच्या माध्यमातून कृषि विभागाच्या 

योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा कृषी विभागाचे आवाहन


लातूर दि.17(जिमाका) :- लातूर जिल्ह्यामध्ये कृषि विभागांतर्गत पोकरा, महाडीबीटी व इतर सेवांच्या संदर्भात तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या कार्यशाळा शासनाने दि. 17 सप्टेंबर,2022 ते 2 आक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा मोहीम राबविण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. 

यामध्ये कृषि विभागामार्फत वेगवेगळ्या योजनांचा लाभ महाडीबीटी च्या माध्यमातून देण्यात येतो. तसेच जिल्ह्यातील 282 गावामध्ये पोकरा योजनेचा लाभ पोकरा योजनेच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे देण्यात येतो. या दोन्ही योजना तसेच इतर योजनांचा लाभ सेवा पंधरवाड्या अंतर्गत देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात येईल.

या कार्यशाळेमध्ये संबंधीत शेतकऱ्यांना जागेवर पुर्व संमती देण्यात येतील. तसेच ज्या शेतकऱ्यांचे पुर्व संमती मिळालेले आहे. व कामे पूर्ण झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या अडचणी समजवून घेऊन त्यांना तात्काळ अनुदान मिळण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. 

या अनुषंगाने सर्व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले लाभार्थी पोकरामध्ये अर्ज केलेले लाभार्थी किंवा आणखीन ज्यांना लाभ घ्यायचा आहे, असे लाभार्थी त्या-त्या तालुक्यामध्ये ठरवलेल्या दिनांकास उपस्थित राहून आपण सेवा पंधरवाडा मोहीमेच्या माध्यामातुन आपल्या कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केलेले आहे.

दिनांक 19 सप्टेंबर, 2022 रोजी लातूर येथे, दिनांक 20 सप्टेंबर, 2022 रोजी रेणापूर येथे, दिनांक 21 सप्टेंबर, 2022 रोजी निलंगा येथे, दिनांक 22 सप्टेंबर, 2022 रोजी शिरुर अनंतपाळ येथे,  दिनांक 23 सप्टेंबर, 2022 रोजी औसा येथे, दिनांक 26 सप्टेंबर, 2022 रोजी उदगीर येथे, दिनांक 27 सप्टेंबर, 2022 रोजी अहमदपूर येथे, दिनांक 28 सप्टेंबर, 2022 रोजी देवणी येथे, दिनांक 29 सप्टेंबर, 2022 रोजी जळकोट येथे, दिनांक 30 सप्टेंबर, 2022 रोजी चाकूर येथे त्या-त्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

*

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा