राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते

मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

       लातूर, (जिमाका) दि. 15:- मराठवाडा मुक्ती दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते सकाळी 9-00 वाजता हुतात्मा स्मारक येथे होणार आहे.

        मराठवाडा मुक्ती संग्रामाचे १७ सप्टेंबर, 2022 पासून अमृत महोत्सवी वर्ष सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात सहभागी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात मराठवाडा मुक्ती संग्रामावर अधारित ग्रंथांच्या प्रदर्शनाने होणार असून हे ‘प्रदर्शन हुतात्मा स्मारकाच्या शेजारी आयोजित करण्यात आले आहे. त्यातच मराठवाडा मुक्ती संग्रामातील दुर्मिळ छायाचित्राचे प्रदर्शन ही आयोजित केले आहे. याचे उद्घाटन कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामावरील दोन पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे.

**

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु