जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष व्याख्यानमाला समारोप महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात सोमवारी समारोपीय व्याख्यान मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रशांत देशमुख गुंफणार

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष व्याख्यानमाला समारोप महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात सोमवारी

 

समारोपीय व्याख्यान मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रशांत देशमुख गुंफणार

 

लातूर दि.24 ( जिमाका)  मराठवाडा मुक्ती संग्रामाचे दि. १७ सप्टेंबर २०२२ पासून अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत आहे. युवकांना मराठवाडा मुक्ती संग्रामाची ओळख व्हावी, मागच्या पिढ्याचा या स्वातंत्र्यासाठीचे बलिदान, त्याग,  समर्पण कळावे म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या संकल्पनेतून सोमवार दि. १९ सप्टेंबर २०२२ पासून २६  सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

          या व्याख्यानमालेचा उदघाटन समारंभ सोमवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दयानंद कला महाविद्यालयात येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि ज्येष्ठ लेखक, अभ्यासक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, ज्येष्ठ लेखक,विचार शलाकाचे संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

         मंगळवार दि. २० सप्टेंबर रोजी राजर्षी शाहू महाविद्यालयात व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प राज्यशास्त्राचे अभ्यासक, प्रा. भूषण जोरगुलवार यांच्या व्याख्यानाने गुंफले गेले तर बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे इतिहास अभ्यासक, मराठवाडा मुक्ती संग्रामवर विशेष अभ्यास असलेले भाऊसाहेब उमाटे यांचे व्याख्यान संपन्न झाले. गुरुवार दि. २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे साहित्यिक आणि इतिहास अभ्यासक विवेक सौताडेकर यांचे तर शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी शिवाजी महाविद्यालय, रेणापूर येथे ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक जयप्रकाश दगडे यांचे व्याख्यान झाले. शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथे साहित्यिक प्रा. डॉ. जयद्रथ जाधव आणि जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान झाले.

        या व्याख्यानमालेचा समारोप सोमवार, दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहामध्ये सकाळी ११:०० वा. संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. मन्मथप्पा लोखंडे हे उपस्थित राहणार असून प्रमुख व्याख्याते म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अभ्यासक जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रशांत देशमुख हे या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफणार असून प्रमुख अतिथी म्हणून श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक मा. माधवराव पाटील तपसे चिंचोलीकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक  निखील पिंगळे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आणि लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य प्रोफेसर राजकुमार लाखादिवे, IQAC समन्वयक कॅप्टन डॉ. बाळासाहेब एम. गोडबोले, मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. संजय गवई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी लातूर शहरातील नागरिक, पत्रकार, संशोधक, इतिहास अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु