पाठ्ययपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी असल्याने सर्व व्यवहार बंद राहतील
पाठ्ययपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत पुस्तके व कागदाची
वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी असल्याने सर्व व्यवहार बंद राहतील
*लातूर,दि.24(जिमाका):-*
पाठयपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या सर्व मुद्रक -
बांधणीकार व पुस्तक विक्रेते तसेच शैक्षणिक संस्था इत्यादींनी दि. 28 सप्टेंबर,2022
ते दि. 1 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी
होणार असल्याने या कालावधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगांव, पुणे, नागपूर, औरंगाबाद,
लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व व्यवहार (आवक-जावक, विक्री इत्यादी)
बंद राहतील, तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे, भांडार व्यवस्थापक
पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र , लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले
आहे.
Comments
Post a Comment