सेवा पंधरवाडा अंतर्गत नागरिकांची कामे कालमर्यादेत मार्गी लावावीत -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या सुचना

 

सेवा पंधरवाडा अंतर्गत नागरिकांची कामे कालमर्यादेत मार्गी लावावीत

-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या सुचना

 

लातूर,दि.21 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची कामे कालमर्यादेत व्हावीत. याकरीता दि. 17 सप्टेंबर, 2022 ते दि. 2 ऑक्टोबर,2022 या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शासकीय विभागांनी त्यांच्याकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांविषयी प्रलंबित कामांचा कालमर्यादेत निपटारा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या.  

सेवा पंधरवाड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग, कृषि विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागांकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित सेवाविषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरीता कार्यपध्दती निश्चित करणे व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुण देणे, सर्व संबंधित विभागांच्या जिल्हा प्रमुखांनी सेवा पंधरवडयाचे यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता नियोजन करणे व या संबंधातील प्रगतीविषयी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेणे आणि क्षेत्रीय भेटी देण्याबाबत देखील निर्देश दिले आहेत.  

शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडयाविषयी जनतेमध्ये माहिती होण्याकरीता सेवा पंधरवडा कालावधीत मान्यवरांच्या भेटी, आयोजित शिबीरे, त्यामधील नागरिक प्रशासनाचा सहभाग या विषयी सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या आहेत.  

 

                                                                     ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा