शिधापत्रिकेस आधार जोडणी करावयाचे प्रलंबित असेल त्यांनी विशेष कॅम्प मध्ये सहभागी व्हावे -देवणी तहसीलदार यांचे आवाहन
शिधापत्रिकेस आधार जोडणी करावयाचे प्रलंबित असेल
त्यांनी
विशेष कॅम्प मध्ये सहभागी व्हावे
-देवणी
तहसीलदार यांचे आवाहन
*लातूर,दि.20(जिमाका):-* अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्य
वितरण करण्यात येते. देवणी तालुक्यातील अन्नधान्य वितरण प्रणालीच्या विविध
योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार सीडिंग करावयाचे प्रलंबित राहिले आहे व शासन
स्तरावरून सततचा पाठपुरावा करूनही 100 टक्के आधार सिडिंग होत नसल्याने रास्त भाव
दुकानदार यांचे मार्फत e pos मशीन द्वारे विशेष कॅम्प मोहीम राबवण्यात येणार आहे.
सदरील मोहीम ग्राम पातळीवर दक्षता समिती
सदस्यांच्या बैठकांद्वारे तसेच मंडळ निहाय तलाठी सज्जा निहाय नोडल अधिकारी व
पर्यवेक्षक म्हणून तलाठी व मंडळ अधिकारी यांची नेमणूक करून यशस्वी करण्यात येणार
आहे. देवणी तालुक्यातील अन्नधान्य वितरण प्रणालीचे 100 टक्के आधारचे व ई -केवायसी
चे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेपूर्वी गावोगावी दवंडी व
सोशल मीडिया द्वारे प्रसिद्धी देण्यात येत आहे.
देवणी तालुक्यात 21सप्टेंबर 2022 रोजी रास्त भाव
दुकान स्तरावर विशेष कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. तरी याद्वारे देवणी
तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्यांचे कोणाचे शिधापत्रिकेस
आधार जोडणी करावयाचे प्रलंबित असेल त्यांनी विशेष कॅम्प मध्ये सहभागी व्हावे व 100
टक्के आधार सीडींग साठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले.
Comments
Post a Comment