निलंगा तालुक्यातील हासुरी गावची स्वा.रा.ती.म.विद्यापीठाच्या भुगर्भशास्त्राच्या तज्ञ टीम कडून पाहणी, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
निलंगा तालुक्यातील हासुरी गावची स्वा.रा.ती.म.विद्यापीठाच्या
भुगर्भशास्त्राच्या तज्ञ टीम कडून पाहणी, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लातूर, दि.14 (जिमाका):- लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासुरी येथे आज जिल्हा प्रशासनाच्या सांगण्यावरून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भुगर्भाशास्त्र विभागाच्या टिमने भेट दिली. सदरील क्षेत्र किल्लारीपासून जवळच असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. तसेच धोकादायक घरामध्ये आश्रय न घेण्याचा सल्ला दिला. भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था, नवी दिल्ली यांच्या टिमलाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. यावेळी आ. अभिमन्यू पवार उपस्थित होते. त्यांनी लातूर जिल्ह्यातील भूकंप आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम व सदृढ करण्याच्या सूचना यावेळी केल्या. तसेच विद्यापीठाच्या पथकासह आज हासोरी गावात भेट देऊन पाहणी केल्याचे सांगून नागरिकांनी भीती दूर करून क्षमता बांधणीच्या आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याचे सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी यानी भूकंप व्यवस्थापनाच्या
अनुषंगाने विविध टिम गठीत करून त्यांचें प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश देऊन नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत असल्याचे
सांगितले. या गावातील धोकादायक इमारतीना तात्काळ नोटीस देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी
यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या आहेत. पर्यायी तात्पूरत्या निवाऱ्याची सोय जिल्हा
परिषद शाळा, मंदिर या संदर्भातील तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी.यांनी यावेळी दिली.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
श्री अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, निलंगा उपविभागीय अधिकारी शोभा
जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, वरीष्ठ भु वैज्ञानिक डॉ.एस.बी.
गायकवाड, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या भुगर्भाशास्त्र विभागाच्या टिमचे
पथक प्रमुख डॉ. के.विजय कुमार, डॉ.अर्जुन भोसले, संकुलाचे संचालक डॉ. अविनाश कदम, उपकेंद्राचे
डॉ. प्रमोद पाटील,आपत्ती व्यवस्थापन टिम आदी संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती
होती.
****
Comments
Post a Comment