*जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप श्री.महात्मा* *बसवेश्वर महाविद्यालयात संपन्न*

 

*हैद्राबाद संस्थांन मुक्तीचा लढा हा जनतेचा,*

*शेतकऱ्यांचा आणि मानव मुक्तीचा लढा होता*

                                                                           *-प्रा. डॉ. प्रशांत देशमुख*

 

§  *जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस* *अधिक्षक निखिल पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती.*

 


*
लातूर दि.26 ( जिमाका )* हैद्राबाद संस्थान मुक्तीचा लढा हा कोणत्याही दोन समुदायात नव्हता. तो लढा होता, निजाम या जुलमी शासकाच्या विरुद्धचा त्यामुळे हा मुक्तीचा लढा हा जनतेचा, शेतकऱ्यांचा आणि मानव मुक्तीचा लढा होता असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालय,लातूरच्यावतीने आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव व्याख्यानमालेचे समारोपीय पुष्प महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात गुंफताना ते बोलत होते.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे हे होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसे चिंचोलीकर,


जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, इतिहास संशोधक विवेक सौताडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, (IQAC) समन्वयक कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे समन्वयक डॉ.संजय गवई आणि जेष्ठ नागरिक श्री. हुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत देशमुख म्हणाले की, हा लढा तेलंगणा येथे सलोखा दिवस, कर्नाटकात जनता मुक्ती दिवस तर मराठवाडयात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. हा लढा स्वामीजी विरुद्ध निजाम, हिंदू विरुद्ध मुस्लिम अथवा स्टेट कॉंग्रेस विरुद्ध इत्तेहादुल असा नव्हता, तर जनतेचा आणि शेतकऱ्यांचा मानव मुक्तीचा लढा होता. निजाम हा अत्यंत चतुर आणि धूर्त असल्यामुळे त्यांनी आपल्या प्रदेशाला भविष्यात स्वायत्त देश करण्यासाठी सुरुवातीला पासून प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठीच्या लढ्याला अनन्य साधारण असे महत्व आहे.


जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात व्याख्यानमालेनी करण्यामागची भूमिका विशद करतांना म्हणाले,आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, मराठवाडा हा निजामाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मराठवाड्यातील अनेक क्रांतिकारकांचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. हे वर्षे मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे युवकांना मराठवाडा मुक्ती संग्रामाची ओळख व्हावी, मागच्या पिढ्याचा या स्वातंत्र्यासाठीचे बलिदान, त्याग, समर्पण कळावे म्हणून दि. १९ ते २६  सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात यशस्वीपणे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. आज समारोप कार्यक्रम आहे.

          जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात आयोजित केलेली व्याख्यानमाला युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, लवकरच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा संदर्भ ग्रंथाचे काम सुरु केले जाईल. या वर्षात विविध विभागाच्या माध्यमातून हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी सांगितले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड म्हणाले की, आमच्या महाविद्यालयाला                          मा. जिल्हाधिकारी साहेबानी समारोप समारंभ आयोजनाची जबाबदारी दिली. त्याबद्दल आभार व्यक्त केले आणि सर्व आय.ए.एस.अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असेही ते म्हणाले.  

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले.    

            कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संगीत विभागातील प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.गोविंद पवार आणि त्यांच्या चमुनी देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला सर्व मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अश्विनी रोडे, डॉ.रत्नाकर बेडगे, प्रा. सुरेन्द्र स्वामी यांनी केले तर आभार मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. संजय गवई यांनी मानले. प्रमुख व्याखाता परिचय डॉ. दिनेश मौने यांनी करून दिला. सर्व मान्यवराचा ऑनर एन.सी.सी.कडेट्स यांनी केला.  

            या कार्यक्रमाला लातूर शहरातील नागरिक, पत्रकार, संशोधक, इतिहास अभ्यासक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समारोप समारंभाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती आणि कार्यक्रम समितीतील कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. दिनेश मौने, डॉ.सदाशिव दंदे, डॉ.भास्कर नल्ला रेड्डी, डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.विजयकुमार सोनी, डॉ. मनोहर चपळे, डॉ.मंतोष स्वामी, डॉ. दीपक चाटे, डॉ. शितल येरुळे, डॉ. उमा कडगे, प्रा. व्यंकट दुडिले, डॉ. राहुल डोंबे यांच्यासह स्वागत समिती, पुष्पहार, फोटो समिती, बॅचेस समिती, बैठक व्यवस्था स्टेज व डेकोरेशन समिती, सांस्कृतिक सभागृह स्वच्छता समिती, रांगोळी समिती, बॅनर व प्रसिद्धी समिती, सूत्रसंचालन समिती, स्वागत गीत समितीतील सर्व सदस्य आणि ए.जी.वाघमारे, महादेव स्वामी, राम पाटील, योगीराज माकणे, कृष्णा बडगिरे, बालाजी डावकरे, बालाजी होनराव, संतोष येचेवाड, शुभम बिरादार, योगेश मोदी, रमेश राठोड आदींनी अथक परिश्रम घेतले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु