मानसिक आरोग्य आढावा मंडळाची लातूर विभागाची बैठक संपन्न मानसिक आरोग्य आढावा मंडळाचा फायदा* जास्तीत-जास्त मानसिक रुग्णांना व्हावा यासाठी प्रयत्न करावेत
मानसिक आरोग्य आढावा मंडळाची लातूर विभागाची बैठक संपन्न
मानसिक आरोग्य आढावा मंडळाचा फायदा*
जास्तीत-जास्त मानसिक रुग्णांना व्हावा यासाठी प्रयत्न करावेत
*-प्रमुख
जिल्हा न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर*
*लातूर,दि.24(जिमाका):-*
मानसिक आरोग्य आढावा मंडळाचा फायदा जास्तीत-जास्त मानसिक रुग्णांना व्हावा यासाठी प्रयत्न
करावेत असे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर यांनी आवाहन केले .
मानसिक आरोग्य कायदा 2017 अंतर्गत मानसिक रुग्णांना हक्क
अबाधित राहण्याकरीता शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण आठ विभागामध्ये मानसिक आरोग्य
आढावा मंडळाची स्थापना केलेली आहे.
त्याअनुषंगाने लातूर विभागाच्या मानसिक आरोग्य आढावा मंडळाची
पहिली बैठक प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्रीमती सुरेखा कोसमकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच
(दि.20 सप्टेंबर,2022) रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे संपन्न झाली.
या बैठकीत बोलताना प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्रीमती सुरेखा
कोसमकर यांनी सदरील मंडळाच्या कार्यपध्दतीबद्दल आढावा घेतला व मार्गदर्शन केले. मानसिक
आरोग्याबाबत समाजामध्ये जागरुकता येणे गरजेचे असून मानसिक रुग्णांना त्यांचे हक्क मिळावेत
या दृष्टिने मानसिक आरोग्य कायदा - 2017 च्या कायद्याची यशस्वी अंमलबजावणी हे मंडळ
करील अशी आशा व्यक्त केली.
या मंडळासाठी उपसंचालक, आरोग्य
सेवा, लातूर येथे स्वतंत्र कक्ष तसेच अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली
आहे.
या बैठकीसाठी मानसिक आरोग्य आढावा मंडळाचे अध्यक्ष तथा
अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश-4, डी.बी.माने,
यासह आरोग्य सेवा, उपसंचालक श्रीमती कमल व्ही. चामले,
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( वैद्यकीय) डॉ. संजय बी. ढगे,
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे,
मानसोपचार तज्ञ डॉ. शितल तळीखेडकर, डॉ. पी. व्ही. पन्हाळे,
वैद्यकीय व्यावसायिक डॉ. एस. बी. बंडगर, अशासकिय सदस्य आर. बी. जोशी, आर. एम. क्षीरसागर,
सर्व व इतर कर्मचारी सामाजिक मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता ए. एन. कुंभारे, उच्च लघुटंकलेखक
बी. एस. अंभोरे, कार्यक्रम सहाय्यक पी. एस. मुळे उपस्थित होते.
तसेच सदरची बैठक व्यवस्थेकामी जिल्हा व सत्र न्यायालय,
लातूर प्रशासन अधिक्षक बी.बी.दळवे, श्री. कलशेट्टी यांनी सहकार्य
केले.
****
Comments
Post a Comment