Posts

‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत शनिवारी विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती

  ‘विकसित भारत संकल्प यात्रा ’ अंतर्गत   शनिवारी   विविध  गा वांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती   लातूर, दि. 29 (जिमाका):   केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा ’ ही विशेष मोहीम   24 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत शनिवार,   30 डिसेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या...

हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकानासाठी 4 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकानासाठी 4 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन   लातूर ,   दि. 28   ( जिमाका):    दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याची योजना लागू करण्यासं 10 जून, 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. यांच्या स्तरावरुन सुरु आहे. या योजनेसाठी 4 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटूंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजनेचा उद्देश आहे.   योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना देण्यासाठी 3 डिसेंबर 2023 पासून ऑनलाईन नाव नोंदणीची कार्यवाही सुरु आहे. ...

प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेण्याची गरज - अमोल गिराम

Image
  ·         राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ·         विविध शासकीय योजनांविषयी जनजागृती लातूर , दि. 28 ( जिमाका): प्रत्येक व्यक्ती हा जन्मापासून ते मृत्युपर्यंत ग्राहक असतो. त्यामुळे त्याला ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अमोल गिराम यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्य रेखा जाधव, रवींद्र राठोडकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद तिवारी, प्रांत ग्राहक संरक्षणचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य गीता मोरे,...

‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत शुक्रवारी विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती

                                              ‘विकसित भारत संकल्प यात्रा ’ अंतर्गत   शुक्रवारी   विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती   लातूर, दि. 28 (जिमाका):   केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा ’ ही विशेष मोहीम   24 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी,   29 डिसेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन...

रेणापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार

                                                 रेणापूर येथील मुलांच्या   शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार   लातूर ,   दि.   27   (जिमाका) :    राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संचलित   रेणापूर   येथील   मुलांच्या   शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत भाडे तत्वावर घ्यावयाची आहे. तरी   रेणापूर नगरपरिषद हद्दीतील इमारत मालकांनी आठ दिवसाच्या आत   रेणापूर   येथील   मुलांचे    शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहासाठी 100 विद्यार्थ्यांची निवासाची सोय, पुरेशे बाथरुम, रुम्स, टायलेट्स, 24 तास मुबलक पाणी, हॉल्स, किचन, विद्युत व्यवस्था, पार्किंग अशी व्यवस्था असणारी सर्व अत्यावश्यक सोयी सुविधायुक्त इमारत आवश्यक आहे. अशी इमारत असल्यास इमारतीमधील उपलब्ध सोयी सुविधांची माहिती, इमारतीचे फोटो, इमारत मालकी ...

‘विकसित भारत संकल्प यात्रा’अंतर्गत गुरुवारी विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती

                                                     ‘विकसित भारत संकल्प यात्रा ’ अंतर्गत   गुरुवारी विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती   लातूर, दि. 27 (जिमाका):   केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा ’ ही विशेष मोहीम   24 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत   गुरुवार,   28 डिसेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला...

मुद्रांक शुल्क व दंड सवलतीसाठी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

                                                             मुद्रांक शुल्क व दंड   सवलतीसाठी   अभय   योजनेचा   लाभ घेण्याचे आवाहन      लातूर, दि. 27 (जिमाका):     शासनाने   मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना -2023 लागू केली आहे. ही योजना दोन टप्प्यामध्ये लागू असून पहिल्या टप्प्यात 1 जानेवारी, 1980 ते 31 डिसेंबर, 2000 या कालावधीतील नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्तातील शासनास देय होणाऱ्या तथा वसुलीस पात्र संपूर्ण शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये   सवलत लागू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ   पात्र व्यक्तींनी घेण्याचे आवाहन   आवाहन   मुद्रांक जिल्हाधिकारी सं. श्री. देशमुख यांनी केले आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर, 2023 ते 31 जानेवारी, 2024 पर्यंत दये होणारी मुद्रांक शुल्क रक्कम 1 लाखापर्यंत देय असलेल्या मुद्रांक शुल्क व दंड रक्कमेस माफी व 1 लाखाच्य...