Posts

Image
लोक अदालतीमध्ये 61 लाख 68 हजार रक्कमेची 46 प्रकरणी निकाली          लातूर,दि.13: येथील जिल्हा सत्र न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 61 लाख 62 हजार रकमेची 46 प्रकरणे तडजोडीने निकालात काढण्यात आलेली आहेत. लातूर येथील राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश व्ही. डी. डोंगरे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात श्री. डोंगरे यांनी लोकन्यायालयाचे महत्व विषद केले.  या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. के. चौदंते व इतर न्यायाधीश तसेच जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी ॲड. अमोल निंबुर्गे, ॲड. डी. व्ही. पाटील, ॲड. एस.व्ही. सलगरे, ॲड. डी.एस.कांबळे, बॅंक व फायनान्स कंपनीचे अधिकारी, पक्षकार आणि कर्मचारी उपस्थित होते.                या लोकादालत मध्ये धनादेशाची प्रकरणे, बॅंक वसुलीचे, इतर वसुलीचे प्रलंबीत व वादपुर्व 2555 एवढे प्रकरणे ठेवण्यात आले होते. त्यापैकी 61,68,176/- इतक्या रक्कमेची 46 इतकी प्रकरणे तडजोड...
Image
सर्व बॅंकांनी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट 31 ऑगस्ट् पर्यंत पुर्ण करावे                                             -जिल्हाधिकारी पांडुरंग पोले          लातूर,दि.12: जिल्हातील सर्व बॅंकाना खरीप पीक कर्ज वाटपाचे असलेले 1 हजार 360 कोटीच्या उद्दिष्टांपैकी 748 कोटीचे पीक कर्ज शेतक-यांना वाटप केलेले आहे. तरि सर्व बॅंकानी उर्वरित पीक कर्जाचे वाटप 31 ऑगस्ट 2016 पर्यंत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिले.                 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी पोले बोलत होते. यावेळी आमदार विनायक पाटील, रिझर्व्ह बॅंकेचे प्रतिनिधी मोहन सांगवीकर, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी अरुण महाजन, नाबार्डचे...
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण ना. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते         लातूर,दि.11: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट 2016 रोजी मुख्य ध्वजारोहण राज्याचे कामगार, कौशल्य विकास, भुकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकूलच्या प्रांगणात सकाळी 9 वाजून 05 मिनिटांनी होणार आहे. तरि जिल्ह्यातील सर्व नागरिक  विद्यार्थी, पालक, पदाधिकारी, अधिकारी , कर्मचारी व पत्रकारांनी या समारंभ व संचलन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय :-             भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण होणार आहे. तरि सर्व अधिकारी व कर्मच्या-यांनी राष्ट्रीय पोषाख परिधान ...
शेतक-यानी खरीप हंगाम पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन लातूर,दि.10: चालू खरिप हंगामात लातूर जिल्ह्यात कडधान्य, गळीतधान्य,तृणधान्य व ऊस पिकासाठी पंचायत समिती पातळीवर, जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर पिकस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सदर पिकस्पर्धेत शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी खरिप हंगाम पिकासाठी 15 ऑगस्ट 2016 ही शेवटची तारिख आहे. सदर स्पर्धेत सहभागी होऊ ईच्छुणाया शेतक-यांनी प्रवेश फिसची रक्कम 15 ऑगस्ट 20106 पुर्वी चलनानी भरुन विहीत नमुन्यातील  प्रवेश अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी अथवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी सदर पिकस्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मोहिम अधिकारी महेश क्षीरसागर, कृषि विकास अधिकारी बी.एस.रणदिवे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम यांनी प्रशिधी पत्रकान्वये केले आहे.  सदर पिकस्पर्धेत पंचायत समिती पातळीवरील स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणा-या शेतक-यास अनुक्रमे 2500/-, 1500/- व 1000/- रुपये, जिल्हापातळीवरील स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणा-या शेतक-यास  अनुक्रमे 5000/-, 3000/, व ...
खा. सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक         लातूर,दि.10: जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची पुर्नरचना झाली असून त्या ऍवजी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची पहिली बैठक खासदार सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरि सर्व संबंधीत समिती सदस्य व विविध शासकीय यंत्रणेचे अधिकारी यांनी या बैठकीस परिपुर्ण माहितीसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) लातूर यांनी केले आहे. *****
Image
प्रशासनामार्फत जलदुतच्या 111 व्या फेरीचे पुजन करून निरोप लातूरला जलदुत @111 फेरीतून 25 कोटी 95 लाख लिटरचा पाणी पुरवठा         लातूर,दि.9: शासनाने लातूर शहरातील भीषण पाणी टंचाईची परिस्थिती पाहुन मिरज येथून रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दिनांक 12 एप्रिल 2016 रोजी पाण्याची पहिली रेल्वे लातूर येथे आली व आज पावेतो जलदुत रेल्वेने 111 फे-यातून एकूण 5 हजार 290 वॅगन मधून लातूर शहराला 25 कोटी 95 लाख लिटरचा पाणी पुरवठा केलेला आहे.             दिनांक 9 ऑगस्ट 2016 रोजीच्या 111 व्या जलदुतच्या फेरीचं प्रशासनामार्फत पूजन करुन व हिरवी झेंडी दाखवून जलदुतला निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग, महापौर ॲड. दिपक सुळ, उपमहापौर श्री. लाहोटी, स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर स्मिता खानापूरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता श्री सुशिर, रेल्वे वाणिज्य विभागाचे निरीक्षक रमेश काळे आदि मान्यवर उपस्थित होते. ...
Image
महिलांनी वेळीच जागी होऊन मुलांच्या नवीन संकल्पनांना वाव द्यावा : पांडूरंग पोले लातूर, दि.4 : समाजात दिवसेंदिवस पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होत आहे. पुरुष व महिलांतील ही तफावत मोठी समस्या निर्माण करणारी आहे. यासाठी महिलांनी वेळीच जागे होऊन मुलांचा आग्रह धरणाऱ्या जुन्या संकल्पना मोडीत काढव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले. महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत आज दिनांक 04 ऑगस्ट 2016 रोजी  मुरुड (ता. लातूर) येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित महिला सक्षमीकरण मेळाव्यात श्री. पोले बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. प्रताप काळे, तहसीलदार संजय वारकड, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष हणुमंत नागटिळक, मुरुडच्या रुरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष किशनराव नाडे, पंचायत समितीचे माजी सभापती यशवंतराव नाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश उनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) चंद्रशेखर केकान व गटविकास अधिकारी डी. एच. दाईंगडे यांची   प्रमुख उपस्थिती होती. श्री. पोले म्हणाले, ‘‘ विविध क्षेत्रात महिला पुरुषांच्या...