लातूर जिल्ह्यातील १३ ठिकाणचे 'रोजगार महाकुंभ मेळावे' स्थगित
लातूर जिल्ह्यातील १३ ठिकाणचे 'रोजगार महाकुंभ मेळावे' स्थगित
लातूर, दि. २४ : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून 'युवा शक्ती हीच राष्ट्र शक्ती' या संकल्पनेला अनुसरून २९ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी १३ विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेले 'रोजगार महाकुंभ मेळावे' तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीची अधिसूचना प्राप्त झाली असून २२ सप्टेंबर २०२६ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (शासकीय तंत्र प्रशाळा, लातूर), महिला बीसीए महाविद्यालय (एम.आय.डी.सी लातूर), गुरूजी खाजगी आयटीआय (वासणगाव रोड, लातूर), प्रचिती कॉम्प्युटर्स इन्स्टिट्यूट (मेन रोड, लातूर), जन शिक्षण संस्था (अंबेजोगाई रोड, लातूर), प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रा. लि. (किल्लारी, ता. औसा), साई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट (रामनगर, औसा), शहीद श्रीधर चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (निलंगा), मल्हारराव होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (चाकूर), शिवाजी महाविद्यालय (रेणापूर), महात्मा गांधी महाविद्यालय (अहमदपूर), ममता गारमेंट ॲन्ड मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्युट (अहमदपूर) आणि राजीव गांधी आय.टी.आय. कॉलेज (उदगीर) अशा एकूण १३ ठिकाणी एकाच दिवशी या भव्य रोजगार मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले होते.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे हे सर्व मेळावे स्थगित करण्यात आले असून, या रोजगार महाकुंभ मेळाव्यांची पुढील तारीख , वेळ व ठिकाणे यथावकाश घोषित करण्यात येतील. तरी या मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व उद्योजक, आस्थापना तसेच युवक-युवतींनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे.
***
Comments
Post a Comment