Posts

नाशिक येथे लातूर जिल्ह्यातील चार विविध शेतकऱ्यांचा गौरव लिंबाळवाडी - नागनाथ पाटील, मोहनाळ - दिनकर पाटील, महादेववाडी - ओमकार मसकल्ले, मुरुड बु. येथील मुरलीधर नागटिळक यांना गौरविण्यात येणार

Image
  नाशिक येथे लातूर जिल्ह्यातील चार विविध शेतकऱ्यांचा गौरव लिंबाळवाडी - नागनाथ पाटील, मोहनाळ - दिनकर पाटील, महादेववाडी - ओमकार मसकल्ले, मुरुड बु. येथील मुरलीधर नागटिळक यांना गौरविण्यात येणार  लातूर,दि.29 (जिमाका):-    राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दि. २ मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभ...

लातूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध

  लातूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध *गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा*           * लातूर,दि.28(जिमाका):-* लातूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध्‍ आहेत. याचा लाभ गरजू रुग्णांना मिळण्याकरीता सदरील धर्मादाय रुग्णालयांची यादी व इतर लागणारी अनुषंगिक माहिती याबाबतचे   टिपन पूढील प्रमाणे आहे.          धर्मदाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार. निर्धन रुग्ण ज्यांचे वार्षीक उत्पन्न रु. 85 हजार पेक्षा कमी आहे.दुर्बल घटकातील रुग्ण ज्यांचे   उत्पन्न रु. 1 लाख 60 हजारापेक्षा कमी आहे.         उपचारासाठी लागणारे कागपत्रे- पिवळी शिधापत्रिका किंवा दारिद्रय रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.      ...

संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा

  संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  यांचा लातूर   जिल्हा दौरा   *लातूर,दि.28(जिमाका):-* राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे   हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार   दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6.30 वाजता रेल्वे स्टेशन लातूर येथे आगमन, निवासस्थानाकडे मोटारीने प्रयाण व राखीव. दुपारी 3.00 वाजता लातूर येथून मोटारीने मौ. वांजरवाडा ता. जळकोटकडे प्रयाण, सायं.5.00 वाजता श्री. संत गोविंद माऊली यात्रेनिमित्त सदिच्छा भेट, स्थळ- मौ. वांजरवाडा ता. जळकोट, सायं. 6.30 रमजान निमित्त इफ्तार पार्टीस उपस्थिती. स्थळ- जामा मस्जिद, मरकज, जळकोट, सायं. 7.30 वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतिनिमित्त कार्यक्रमास मो. माळहिप्परगा येथे उपस्थिती व सोईनुसार मोटारीने उदगीरकडे प्रयाण. उदगीर   येथे राखीव व मुक्काम.   0000      

केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे आर्थिक मदतीची प्रकरणे ऑन लाईन पाठवावेत

  केंद्रिय सैनिक बोर्ड , नवी दिल्ली यां च्या कडे आर्थिक मदतीची प्रकरणे ऑन लाईन पाठवावेत             * लातूर,दि.28,(जिमाका):-* माजी सैनिक/विधवांचे पाल्यासाठी केंद्रिय सैनिक बोर्ड , नवी दिल्ली यां च्या कडे सन 2022-2023 साठी RMDF/AFFDF मधुन आर्थिक मदत मिळण्यासाठी अर्ज सादर करणेबाबत हवलदार पदापर्यंतच्या माजी सैनिक/माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड , नवी दिल्ली यांचे RMDF मधुन शैक्षणिक आर्थिक मदत देण्याची तरतुद आहे. ऑनलाईन   प्रकरणे सादर करावयाच्या तारखा पूढी लप्रमाणे आहेत . आर्थिक मदत , वर्ष/तारीख/इयत्ता , अंतिम तारीख पूढील प्रमाणे आहे. चरितार्थासाठी आर्थिक मदत , दिनांक ०१ एप्रिल रोजी वय वर्ष ६५ व पेंशन नसलेले माजी सैनिक व विधवा साठी वार्षिक रु. ४८ हजार   सन २०२२-२०२३ (आरंभीसाठी) ३१ मार्च २०२३ , सन २०२२-२०२३ (नुतनीकरणासाठी) ०१ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ . शिक्षणाची आर्थिक मदत पहिल्या व दुस या पाल्यास रु. १२ हजार   पर्त्येकी   पहिली   ते नववी व अकरा वी ३० सप्ट...

महाराष्ट्र दिनी जिल्हाभरात सामाजिक न्यायाचा जागर

  महाराष्ट्र दिनी जिल्हाभरात सामाजिक न्यायाचा जागर           *लातूर,दि.28,(जिमाका):-* जिल्हयामध्ये दि. 01 मे, महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील गावागावात झेंडावंदनाच्या   ठिकाणी योजनांची माहितीपत्रिका / माहितीपुस्तीका पोहचणार तसेच सामाजिक लोकप्रतिनिधी / प्रशासकिय अधिकारी - कर्मचारी जनतेला विविध योजनांची माहिती देणार आहेत. दिनांक 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अंमलात आणली असून यासंदर्भात दि.21 एप्रिल 2022 रोजीचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार दि.01 मे, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून संबंध जिल्ह्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपुस्तीका किंवा माहितीपत्रीका वाटप करण्यात येणार आहे.   जिल्हयांच्या ठिकाणी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, यांचे प्रमुख उपस्थितीत योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिका, नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत व ग्रामिण भागात लोकप्रतिनिधी ...

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी *लातूर,दि.28,(जिमाका):-* जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे    यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत दि. 1 मे 2022 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते दि. 15 मे 2022   रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.       या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा...

7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

  7 मे 2022 रोजी  राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन              * लातूर,दि.28 (जिमाका):-*   लातूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये   शनिवार दि. 07 मे, 2022 रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र   राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानूसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.                 यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होवून न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा   न्या. सुरेखा कोसमकर यांनी केले आहे.           राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.   सदरचे लोक अदालत आभासी पध्दतीव्दारे देखील आयोजित करण्यात आले आहे.   आपआपसातील वाद समझोत्यान...