जिल्ह्यात ‘समता पर्व’ अंतर्गत 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम * लातूर , दि . 25 ( जिमाका ) : * संविधानाची ओळख सर्वांना व्हावी, यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान निर्मीतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, संविधान दिन अर्थात 26 नोव्हेंबर 2022 ते 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब महापरिनिर्वाण दिनापर्यंत ‘समता पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी दिली. संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी शासकीय वसतिगृह , शासकीय निवासी शाळा , समाजकार्य महाविद्यालय , निवासी तथा अनिवासी आश्रमशाळा तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेत संविधान रॅली व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येईल. तसेच संविधानाचे वाचन, तसेच ‘संविधान’ विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचे मागदर्शन होईल. जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह , शासकीय निवासी शाळा , समाजकार्य महाविद्यालय , निवासी तथा अनिवा...
Posts
- Get link
- X
- Other Apps
‘लातूर ऑफिसर क्लब’च्या चमूचे समुद्रखाडी जलतरण स्पर्धेत यश लातूर , दि. 25 (जिमाका) : विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या राज्यस्तरीय समुद्रखाडी जलतरण स्पर्धेत लातूर ऑफिसर्स क्लबच्या चमूने यश मिळविले. या स्पर्धेत क्लबचे पाच विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी दोन विद्यार्थ्यांनी पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्पर्धा पूर्ण केली. अभय देवकते याने तीन किलोमीटर अंतर 41 मिनिट 13 सेकंदात , तर अलोक मंठाळे याने हेच अंतर 42 मिनिटे 35 सेकंदात पूर्ण केल. या दोन्ही विद्यार्थ्यांना विजयदुर्ग येथे प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक डॉ. महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. ऑफिसर्स क्लब संस्थापक अध्यक्ष जी. श्रीकांत , क्लबचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि क्लबचे सचिव तथा उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी या चमूचे अभिनंदन केले. दोन्ही विद्यार्थ्यांचा लातूर ऑफिसर क्लबचे गोल्ड मेंबर शिवराज मोटेगांवकर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ऑफिसर क्लब गोल्ड मेंबर तथा क्लब खजिनदार डॉ. विश्वास कुलकर्णी, क...
दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड देण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
- Get link
- X
- Other Apps
दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड देण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. · जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या व्यवस्थापन समितीची सभा · जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन लातूर , दि . 25 ( जिमाका ) : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड देण्यासाठी 2 आणि 3 डिसेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष देशपांडे, संवेदना प्रकल्पाचे सुरेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, समाज कल्याण विभागातील राजू गायकवाड, बाळासाहेब वाकडे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यंकट लामजणे य...
ग्रंथोत्सवातील परिसंवादातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा इतिहास संशोधकांचा सहभाग
- Get link
- X
- Other Apps
ग्रंथोत्सवातील परिसंवादातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा इतिहास संशोधकांचा सहभाग लातूर, दि.२२ (जिमाका) : राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये (टाऊन हॉल) आयोजित ग्रंथोत्सवातील परिसंवादात आज मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा मिळाला. या परिसंवादात इतिहास संशोधक, वक्त्यांनी ऐतिहासिक घटनांची मांडणी केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक जयप्रकाश दगडे होते. प्रा. भूषणकुमार जोरगुलवार, प्रा. डॉ. सदाशिव दंदे, प्रा. डॉ. सतीश यादव, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहशिक्षक भाऊसाहेब उमाटे यांनी परिसंवादात आपले विचार मांडले. निजाम हा स्वतंत्र हैद्राबाद राष्ट्र उभारणीच्या तयारीला लागला होता. साधारणपणे १९२० च्या दरम्यान, गांधीजींचा संस्थानिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोण सुरुवातीला सहानुभूतीचा होता. परंतु, १९३५ च्या कालखंडात निजामासारख्या संस्थानिकांचे वर्तन पाहून गांधीजींचे मत बदलले आणि वरकरणी निजामाविरुध्द जनसामान्य असा वाटणारा ल...
हिप्पळगाव (गणेशवाडी) प्राचीन अध्ययन केंद्र - युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी, लातूर
- Get link
- X
- Other Apps
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त विशेष लेखमाला (भाग-5) हिप्पळगाव (गणेशवाडी) प्राचीन अध्ययन केंद्र आपण मागच्या लेखात शिलालेख आणि ताम्रपटाच्या उल्लेखासह माहिती दिली होती.या लेखात त्याबाबत लातूर जिल्ह्यातील काही गावांचा इतिहास वारसा बघू या...मध्य काळातील ग्रामनामांचे संदर्भ आजही उपलब्ध होतात. जलग्राम म्हणजे जवळगा, मुगुली म्हणजे आजची कलमुगली आहे. बाराशे-तेराशे वर्षापूर्वी तेरणा-मांजरा दरम्यानच्या या परिसरात वेदाध्ययन होत होते. तिसरा कासारशिरसी ताम्रपट डॉ. देवीसिंग चौहान यांना प्राप्त झाला. याचा काळ शक ७०५ (इ.स.७८३) असा आहे. यात या परिसरासंदर्भात अधिक वृत्तांत नाही. पण या तीन ताम्रपटांमुळे या परिसराची जिल्ह्याची वैदिक परंपरा नव्याने प्राप्त होते. बाराव्या-तेराव्या शतकातील 'नवोपलब्ध कल्पसमूह" या ग्रंथात खरोसा या नगरीचा संदर्भ वैद्यकशास्त्रातील रसविद्येशी जोडता येतो. चौथा संदर्भ गणेशवाडी शिलालेखाचा आहे. गणेशवाडी हे गाव नसून हिप्पळगावचा परिसर आहे. जवळच नळेगाव असून तेथेच शिवपूर (प्राचीन सिंदाळे) आहे. येथील भग्नमंदिरात एक अप्रकाशित कानडी लेख आहे. हा शिलालेख ५२ ओळीं...
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यातील 710 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी लातूर, दि. 22 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अविरत कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेवून शहरातील 710 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत ही मोहीम राबविण्यात आली. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य व रक्त तपासणी करण्यात आली. या मोहीमेच्या समन्वयाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक राज नरवटे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. आनंद कलमे व अमोल झेंडे यांनी सांभाळली. मोहीमेसाठी आरबीएसके पथकातील डॉ. श्रीमती राजुरकर, डॉ. श्रीमती आळंगे , डॉ. सचिन व्यवहारे , श्रीमती गायकवाड , विष्णू कदम व त्यांचे सहकारी व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील राजाभाऊ घुले , प्रकाश बेंबरे , दिपक पवार , कैलास...
ऊस कारखान्यांवरील वजन काट्याविषयी प्रमाणित संचालन कार्यप्रणाली जाहीर · शंका असल्यास खाजगी काट्यावर वजन करता येणार
- Get link
- X
- Other Apps
ऊस कारखान्यांवरील वजन काट्याविषयी प्रमाणित संचालन कार्यप्रणाली जाहीर · शंका असल्यास खाजगी काट्यावर वजन करता येणार लातूर , दि . 22 ( जिमाका ) : शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना फसवणूक होवू नये, यासाठी वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक आणि साखर आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखान्यातील वजन काट्याविषयी प्रमाणित संचालन कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्यात आली आहे. त्यानुसार साखर कारखान्याच्या काट्याबाबत शेतकऱ्याना शंका असल्यास शेतकरी खाजगी वजन काट्यावर वजनाची खात्री करु शकतात. जर कारखान्याने खाजगी काट्यावरील वजन नाकारल्यास किंवा त्रास दिल्यास या बाबतची तक्रार संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाकडे देता येणार आहे. साखर कारखान्यातील वजन काट्याच्या वे-इं...