Posts

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

  कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन   *लातूर,दि.23(जिमाका):* राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेस राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत पुरस्कार देण्यात येतात. तरी या पुरस्कारासाठी शेतकरी, शेतकरी गट, संस्थांनी आपले प्रस्ताव ३० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. कृषि विभागाशी संबंधित पुरस्कारांमध्ये शेती क्षेत्राशी संबंधित उद्यान पंडीत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी गट, कृषि संलग्न संस्था पात्र आहेत. कृषि पुरस्काराच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi....

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित   लातूर , दि. 19 (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे गुरुवारी (दि. 26) सकाळी 9.15 वाजता आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. इतर सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी सकाळी सकाळी साडेआठ ते दहापर्यंत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करू नये. इतर सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी सकाळी साडेआठ पूर्वी किंवा सकाळी दहानंतर आपला ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावा , असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाला नागरिक , अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे अगोदर ध्वजारोहण स्थळी उपस्थित राहावे , असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. *****

प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

  प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण लातूर , दि. 19 (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे गुरुवारी (दि. 26) सकाळी 9.15 वाजता आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. इतर सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी सकाळी सकाळी साडेआठ ते दहापर्यंत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करू नये. इतर सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी सकाळी साडेआठ पूर्वी किंवा सकाळी दहानंतर आपला ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाला नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोशाख परिधान करून नियोजित वेळेच्या 15 मिनिटे अगोदर ध्वजारोहण स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. *****

लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वॉकेथॉन रॅली संपन्न

Image
  लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वॉकेथॉन रॅली संपन्न   *लातूर , दि.18(जिमाका):* 17 जानेवारी 2023 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर तसेच शहर वाहतुक शाखा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दक्ष अॅकडमी, पोलिस दल यांच्या संयुक्त विदयमाने जिल्हा क्रिडा संकूल ते राजीव गांधी चौक या मार्गावर 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 06:45 वाजता वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी रॅलीचे उदघाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चिंतामणी भोये यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. त्यावेळी अशितोष बारकुल, समिर सय्यद,मो.वा.नि. श्रीमती. सविता पवार मो. वा. नि. सचिन बंग मो.वा.नि शांताराम साठे मो.वा.नि, कोरवले मो.वा.नि. सुनिल शिंदे मो.वा.नि. डी.के.लॉढे, वसंत भिसे, उमेश सांगळे, आर.जी. कुलकर्णी, सी.एस. वाघमारे, ड्राईव्हिंग स्कूल चालक मालक अदि या रॅलीमध्ये सर्वांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता. या रॅलीमध्ये शाळेच्या लहान मुलांचा सहभाग होता. तसेच क्रिडा संकुलमधील लोकांनीही उत्स्फुर्त सहभाग नोंदविला व जवळपास रॅलीमध्ये 300 लोकांनी सहभाग नोंदविला होता. य...

राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयात 132 जणांची नेत्र तपासणी

  राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयात 132 जणांची नेत्र तपासणी         लातूर , दि. 14 (जिमाका) :   केंद्र शासनाने 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला आहे. यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयात गुरुवारी आयोजित नेत्र तपासणी शिबिरात शिकाऊ , पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी , तसेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आलेल्या 132 उमेदवारांची नेत्र तपासणी करण्यात आली. मिरागी नेत्रालयाच्या वैद्यकीय पथकामार्फत हे मोफत नेत्र शिबीर आयोजित करण्यात आले होते. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये ,   मोटार वाहन निरीक्षक एम. के. लोणारी ,   समीर इसाक सय्यद ,   एम. एम. गवारे यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी , कर्मचारी तसेच नेत्रालयाचे डॉ. स्वप्नील मानकोस्कर ,   मुकुंद कुलकर्णी ,   श्रीमती महादेवी गडदे ,   श्रीमती मयुरी म्हैसुरे यावेळी उपस्थित होते. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बसविले रिफ्लेक्टर राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत लातूर प्रादेशिक परि...

राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत हेल्मेट वापराविषयी जनजागृती

  राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत हेल्मेट वापराविषयी जनजागृती              लातूर , दि. 13 (जिमाका) :   केंद्र शासनाने 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला आहे. यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत गुरुवारी निलंगा कॅम्प येथे शिकाऊ तसेच पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन व चालकाचे कर्तव्य समजावून सांगण्यात आली.             मोटार वाहन निरीक्षक बजरंग कोरवले , एस. आर. साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाहतूक नियमांविषयी जनजागृती             राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ तसेच पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांमध्ये वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्य...

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

  महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय , विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन लातूर , दि. 13 (जिमाका) :   जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त अनुदानित , विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य , तसेच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती ,   विमुक्त जाती ,   भटक्या जमाती ,   इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी लॉगीनवरील प्रलंबित , नवीन भरावयाचे अर्ज मंजुरीकरिता महाविद्यालयामार्फत समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या लॉगीनवर ऑनलाईन पाठवावेत , असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे. शासनमान्यता प्राप्त अनुदानित , विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य , तसेच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती ,   विमुक्त जाती ,   भटक्या जमाती ,   इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क ,   परीक्षा शुल्क (फ्रीशीप )...