Posts

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 25 (जिमाका): कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके  यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3)  नुसार  संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 25 एप्रिल, 2025 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते  9 मे, 2025 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.    या आदेशान्वये शस्त्रबंदी व जमावबंदी  काळात शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी  वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाण...

विशेष लेख : ‘वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

Image
देशातील माध्यम व मनोरंजन (Media & Entertainment) क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘WAVES 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. 1 मे रोजी, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 1 ते 4 मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. महाराष्ट्र – ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमी’कडे वाटचाल बॉलीवूड, टीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर 'क्रिएटर हब' म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ‘WAVES 2025’ च्या माध्यमातून होतो आहे. ऑस्कर, कान्स आणि दावोससारख्या जागतिक परिषदेच्या धर्ती...

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांचा लातूर दौरा

  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांचा लातूर दौरा लातूर, दि. २४ :  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील हे २७ व २८ एप्रिल २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. अॅड. हेलोंडे यांचे २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ते औसा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेतील. तसेच दुपारी १२ वाजता निलंगा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेतील. दुपारी २ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी ४.३० वाजता लातूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेतील. सायंकाळी ६ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. २९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. *****

उमरगा (हा.) येथील पाणीटंचाईचा तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांकडून आढावा

  उमरगा (हा.) येथील पाणीटंचाईचा तहसीलदार ,  गट विकास अधिकाऱ्यांकडून आढावा लातूर, दि. २४ :   निलंगा तालुक्यातील उमरगा (हा.) येथील पाणीपुरवठ्याबाबत तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आणि गट विकास अधिकारी सोपान अकिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी गावातील पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. निलंगा महसूल मंडळ अधिकारी आणि उमरगा (हा.) येथील तलाठी यावेळी उपस्थित होते. उमरगा (हा.) येथे सुरू असलेल्या जल जीवन मिशनच्या कामाची तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली. हे काम पुढील चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल ,  असे संबंधित ठेकेदाराने सांगितले. गावातील सार्वजनिक विहीर आणि विंधनविहिरीतील पाणी पुढील काही दिवस पुरेल ,  असेही यावेळी सांगण्यात आले. पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून बोअर किंवा विहीर अधिग्रहण अथवा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव पाठवण्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले आहे ,  अशी माहिती तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी दिली. *****

मुंबईच्या वेव्हज् परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर

मुंबई, दि. 24 : केंद्र सरकारच्यावतीने जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्राकरिता ‘वेव्हज् 2025 परिषद’ मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. दि. 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेस विविध देशांचे मंत्री, धोरणकर्ते, उद्योगपती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग वेगाने वाढत असून रोजगारनिर्मितीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज्...

जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

  जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन लातूर ,   दि. 24 (जिमाका):   लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये एक युवक ,   एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारात गौरवपत्र ,   सन्मानचिन्ह आणि वैयक्तिकसाठी १० हजार रुपये आणि संस्थेसाठी ५० हजार रुपये याप्रमाणे रोख रक्कमेचा समावेश राहील. या पुरस्कारासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील सामाजिक कार्य ,   राज्याच्या साधन संपत्तीचे जतन व संवर्धन ,   राष्ट्र उभारणीसाठी सहाय्यभूत कार्य ,   समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य ,   शिक्षण ,   प्रौढ शिक्षण ,   रोजगार ,   आरोग्य ,   पर्यावरण ,   सांस्कृतिक,कला ,   क्रीडा ,   विज्ञान ,   तंत्रज्ञान ,   व्यवसाय ,   महिला सक्षमीकरण ,   व्यसनमुक्ती ,   राष्ट्रीय एकात्मता ,   नागरी वस्ती सुधारणा ,   झोपडपट्टी , ...

महादेववाडी येथे विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरु

  महादेववाडी येथे विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरु लातूर ,  दि.   २२  :   औसा तालुक्यातील महादेववाडी येथे पाणी टंचाई निर्माण झाल्याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने महादेववाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी त्वरित विंधन विहीर  (बोअर)  अधिग्रहीत करण्यात आली असून याद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. महादेववाडी येथे ११० कुटुंब असून सार्वजनिक, शासकीय स्त्रोतांचे पाणी कमी झाल्यामुळे, तसेच काही स्त्रोतांचे पाणी बंद झाल्याने पाणी टंचाई निवारणार्थ खासगी विंधन विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर  प्रस्तावाला  त्वरित मंजुरी देवून पाणी पुरवठा सुरु करण्यात आल्याचे औसाचे तहसीलदार घनश्याम आडसूळ व गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी कळविले आहे. *****