विशेष सैनिकी मेळावा लातूर येथे ११ सप्टेंबर रोजी आयोजित; जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
विशेष सैनिकी मेळावा लातूर येथे ११ सप्टेंबर रोजी आयोजित; जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन लातूर, दि. ०८ (जिमाका): जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदकधारक, माजी सैनिक तसेच माजी सैनिक विधवा यांच्यासाठी आर्मर्ड कोर सेंटर, अहिल्यानगर यांच्या सौजन्याने लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता एका विशेष सैनिकी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये Armoured, Arty, MARATHA LI, Mahar Regt आणि Mech Infantry या विविध रेकॉर्ड ऑफिसचे प्रतिनिधी विशेषत्वाने उपस्थित राहून सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या विविध समस्यांची नोंदणी करून त्यावर त्वरित उपाययोजना आणि आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहेत. या सैनिकी मेळाव्यात उपस्थितांसाठी मोफत वैद्यकीय व दंत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विविध बँकांचे प्रतिनिधी व काउंटर, आधार कार्ड अपडेट व अपग्रेडेशनची सुविधा तसेच विविध प्रकारच्या वाहनांच्या अधिकृत डीलर्सचे स्टॉल्स देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीर...