लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद
लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद • अभियंता दिन, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम • एकाच दिवशी १०५ जणांनी केले रक्तदान लातूर, दि. २० : अभियंता दिन आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने बांधकाम भवन येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. १०५ जणांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता सर्वश्री देवेंद्र नीळकंठ, एम. एम. पाटील, गणेश क्षीरसागर, उप अभियंता संजय सावंत, वाहतूक पोलिस निरीक्षक गणेश कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अपघातामधील जखमी किंवा इतर अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. अशावेळी गर...