Posts

Showing posts from June, 2022

आज सायंकाळी ७.३० वाजता श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रसारण DGIPR च्या सर्व समाज माध्यमावर होणार आहे. सर्वांनी शेअर करावी.

 महत्वाचे आज सायंकाळी ७.३० वाजता श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रसारण DGIPR च्या सर्व समाज माध्यमावर होणार आहे. सर्वांनी शेअर करावी.  ट्विटर:- https://twitter.com/MahaDGIPR फेसबुक:- https://www.facebook.com/MahaDGIPR/  युट्यूब:- https://www.youtube.com/c/MAHARASHTRADGIPR

1 जुलै "कृषि दिन" म्हणुन साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

  1 जुलै " कृषि दिन " म्हणुन साजरा कर ण्याचे   कृषि विभागाचे आवाहन     * लातूर,दि.30(जिमाका):-* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषि संजिवनी मोहीम सप्ताहाची सांगता म्हणून 1 जुलै 2022 रोजी लातूर जिल्ह्यामध्ये कृषि दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद लातूर येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशांत पाटील, गाव - अंकलकोप ता. पलुस जिल्हा सांगली यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मार्गदर्शक प्रशांत पाटील हे सोयाबीन पिकाचे टोकण पद्धतीने एकरी 28 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. तरी जिल्हातील सर्व शेतकऱ्यांनी या   कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.                                          ...

जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय ‘सांख्यिकी दिन ’ उत्साहात साजरा

Image
  जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय ‘सांख्यिकी दिन   ’ उत्साहात साजरा   *लातूर , दि.30(जिमाका)-*   स्वातंत्रोत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्रा . प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपुर्ण योगदाना बददल त्यांचा जन्मदिन   “ 29   जून ”  हा दिवस दरवर्षी   “ सांख्यिकी दिन ”  म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन   2007   पासुन केंद्र शासनाने घेतलेला आहे .   सांख्यिकी दिनाचा मुख्य उददेश सामाजिक व आर्थिक नियोजन आणि धोरणांची आखणी यामधील सांख्यिकीचे महत्व व त्या अनुषंगाने स्व . प्रा .   प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या कार्यातुन जनतेमध्ये विशेषत :   युवा पिढीमध्ये जाणीव व जागृती निर्माण व्हावी ,   त्यांनी प्रेरणा घ्यावी , असे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रतिपादन केले. बुधवार ,   दिनांक   29   जून , 2022   रोजी दुपारी २ .३०   वाजता राष्‍ट्रीय   सांख्यिकी दिनाचा कार्यक्रम जिल्हा सांख्यिकी कार्यालय , ...

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यासाठी डिबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यासाठी डिबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन       * लातूर,दि.29 (जिमाका):-* कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत    जिल्हातील हवामान बदलामूळे उदभवलेल्या परिस्थितीशी जूळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करणे, शेतक-यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने जिल्हातील 282 गावांमध्ये सन 2018-19 पासून प्रकल्पाची अंमलबजावणी सूरू आहे. प्रकल्पाअंतर्गत वैयक्तीक लाभाचे घटक फळबाग लागवड, बांबू लागवड, वृक्ष लागवड, हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन, रेशीम उदयोग, मधूमक्षिका पालन, नाडेप/ गांडूळ खत युनिट, विहिर पुनर्भरण, गोडया पाण्यातील मत्स्य पालन, परसबागेतील कुक्कुटपालन, वैयक्तिक शेततळे (इनलेट व आऊटलेटसह / अस्तरीकरणासह), शेततळे अस्तरीकरण, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, शेडनेट हाऊस, पॉलिहाऊस/पॉलिटनेल इत्यादी वैयक्तीक घटकांचे अर्ज घेणे चालू आहे.     प्रकल्पांतर्गत वरील नमुद केलेल्या घटकांचा लाभ घेण्याकरीता इच्छूक असलेल्या शेत...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रभाग भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर

  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रभाग भौगोलिक सीमा   निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर                * लातूर,दि.29 (जिमाका):-* मा. राज्‍य निवडणूक आयोग , महाराष्‍ट्र यांचे आदेश. रानिआ / जिपपंस 2021 / प्र.क्र. 10 / का- 7 दि - 10 . 05 . 2022 अन्‍वये दिलेल्‍या कार्यक्रमांनुसार लातूर जिल्‍हयातील जिल्‍हा परिषदेच्‍या 66 जागा व त्‍याअंतर्गत असलेल्‍या सर्व पंचायत समित्‍यांच्‍या 132 जागांच्‍या निवडणुकांकरिता प्रभागाच्‍या भौगोलिक सिमा निश्चित करणेबाबतचा कार्यक्रम दिलेला आहे. त्‍यानुसार दिनांक 27 जून 2022 रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिध्‍द केलेली आहे. सदरील अधिसुचना ही महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 ( 1962 चा अधिनियम ( 5 ) चे कलम 12 पोटकलम ( 1 ) अन्‍वये लातूर जिल्‍हयातील जिल्‍हाधिकारी कार्यालय लातूर , जिल्‍हा   परिषद कार्यालय , सर्व उपविभागीय कार्यालय , सर्व तहसिल कार्यालय , सर्व पंचायत समिती कार्यालय येथील फलकावर पाहण्‍यासाठी उप‍लब्‍ध केलेली आहे. ...

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशासाठीचे आवाहन

  *सामाजिक न्याय विभागाच्या* *शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशासाठीचे आवाहन*               * लातूर,दि.29 (जिमाका):-* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत कार्यरत मागासवर्गीय मुलां-मुलींची शासकीय वसतिगृहाकरीता शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षाकरीता रिक्त असलेल्या जागेवर लातूर याठिकाणी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी शालेय विद्यार्थी यांना दिनांक 15 जूलै 2022 कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थी यांना दिनांक 30 जूलै 2022 वरिष्ठ महाविद्यालय (बिगर व्यावसायीक अभ्यासक्रम) विद्यार्थी यांना दिनांक 24 ऑगस्ट 2022 वरिष्ठ महाविद्यालय (व्यावसायिक अभ्यासक्रम) विद्यार्थी यांना दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.        प्रवेशासाठी अर्ज शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांचेकउे उपलब्ध्‍ आहेत.सदर प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज भरुन संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांचेकडे सादर करावेत असे आवाहन गृहपाल, मुलांचे ...

सैनिक हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव यांना थेरगावच्या नागरिकांनी दिला, शोकाकुल वातावरणात निरोप शासकीय इतमामात झाला अंत्यसंस्कार

Image
  *सैनिक हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव यांना थेरगावच्या नागरिकांनी दिला,* *शोकाकुल वातावरणात निरोप* *शासकीय इतमामात झाला अंत्यसंस्कार*           *लातूर, दि.29 (जिमाका):- *भारतीय सैन्यातील ब्रिगेड ऑफ दि गार्डस रेजिमेंट मधील 15 गार्डस बटालियनचे सेवारत सैनिक नंबर 15621167F हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव गाव थेरगाव ता. शिरुर अनंतपाळ जि. लातूर हे कर्तव्य बजावताना दिनांक 27 जून,2022 रोजी दुर्देवी घटनेमध्ये जखमी (Gun Shot Injury)   होऊन 167 मिल्ट्री हॉस्पीटल पठाणकोट येथे दिनांक 27 जून, 2022 रोजी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अमृतसर येथून दिनांक 28 जून, 2022 रोजी हवाई विमानाने निघून पुणे येथे व तेथून   रस्ता मार्गे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथे आणण्यात आले आणि अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, त्यानंतर थेरगावच्या नागरिकांनी तेलंगे सुर्यकांत शेषेराव पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.   यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने बंदुकीच्या चार फेरी सलामी   व मानवंदना देण्यात आली.    ...

लातूर जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून साजरा करणार अतिसार नियंत्रण पंधरवडा

  लातूर जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून साजरा करणार अतिसार नियंत्रण पंधरवडा              * लातूर,दि.28 (जिमाका):-* 27 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली अतिसार नियंत्रण पंरधरवडा राबविण्यासाठी जिल्हा कृती समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही वडगावे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.अर्चना पंडगे यांनी मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली.         राज्यातील अर्भक मृत्यू दर व बाल मृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशातील 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यू मागे अतिसार हे प्रमुख कारण असून सुमारे 7 टक्के बालके अतिसारामुळै दगावतात. त्या बाल मृत्युचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. यामुळेइ सन 2014 ते 2021 मध्ये घेण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवडयाच्या यशस्वीतेनंतर या वर्षी अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शुन्य करणे हे उद्दिष्ट ठेवून जिल्ह्यात 1 ते 15 जुलै 2022 या काला...

सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट कार्यालय स्थलांतर

  सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती* *किनवट   कार्यालय स्थलांतर*              * लातूर,दि.28 (जिमाका):-* महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग अंतर्गत सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि. नांदेड मुख्यालय औरंगाबाद दि. 16 डिसेंबर 2021 पासून समितीची स्थापना करण्यात आली असून समितीचे कार्यालय पूढील पत्त्यावर सुरु करण्यात आलेले आहे. पूढील पत्त्यावर संपर्क साधण्यात यावा.        कार्यालय :- सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट मुख्यालय, औरंगाबाद. प्लॉट नं. 4, सेक्टर सी-1, टाऊन सेंटर, सारस्वत बँके जवळ, सिडको औरंगाबाद- 431003   या पत्त्यावर संपर्क साधावे असे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट (मुख्यालय औरंगाबाद) यानी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.                   ...

फळ लागवडीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

  *फळ लागवडीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन*        *लातूर, दि.28 (जिमाका):-* महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन 2022-23 साठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.          फळबाग लागवडीची मुदत दि. 31 डिसेंबर पर्येत आहे. वैयक्तीक शेतकरी, वैयक्तीक बांधावर लागवड फळपिके, वनीकरण, फुलझाडे यात आंबा, चिकु, पेरु, डाळींब, लिंबु, संत्री, सीताफळ, ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष आदी वैयक्तीक शेतकरी पडीक जमीनीवर लागवड यात आंबा, बोर, नारळ, सिताफळ आदी फुलझाडे लागवडीत गुलाब, मोगरा, निशिगंध यांचा लागवडीमध्ये समावेश होतो. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्याची परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपिक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादीतच देय राहील. अतिरिक्त कलमे / रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही.            लागवड वर्षासह सलग तीन व...

महाकृषी ऊर्जा अभियानातून - कृषीला जोड सौर ऊर्जेची महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची ‘पीएम-कुसुम’ योजना

  *महाकृषी ऊर्जा अभियानातून - कृषीला जोड सौर ऊर्जेची* *महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची ‘पीएम-कुसुम’ योजना                *लातूर,दि.28(जिमाका):-* राज्य शासनाने अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेव्दारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षापासून स्वयंअर्थसहाय्यीत तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाययातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसूम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासानाने घेतला आहे. राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याचे महाकृषी ऊर्जा अभियान जाहीर केले आहे. राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 अंतर्गत प्रतिवर्षी 1 लाख या प्रमाणे पुढील 5 वर्षात 5 लाख पारेषण विरहीत सौर कृषी पंप आस्था...