जिल्हा संसाधन व्यक्ती यांची सेवा लातूर जिल्ह्यासाठी विविक्षित कामांसाठी अर्ज करावेत

 

        जिल्हा संसाधन व्यक्ती  यांची सेवा लातूर

          जिल्ह्यासाठी विविक्षित कामांसाठी अर्ज करावेत

 

            *लातूर,दि.23(जिमाका)-*आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर नव्याने लाभ घेणाऱ्या तसेच सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रक्रिया उद्योगांचे विस्तार करण्यासाठी पाठपुरावा/हाताळणी सहाय्य देण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तींची नामिका सूची (Panel of District Resource Persons) तयार करावयाची आहे. त्यासाठी सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनूसार अर्ज मागविण्यात येत आहेत.

            पदनाम जिल्हा संसाधन व्यक्ती (District Resource Persons)  शैक्षणिक अर्हता- कोणतीही योग्य व्यक्ती जसे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, बँक अधिकारी, बँक मित्र, विमा प्रतिनिधी, वैयक्तीक व्यवसायीक, सहाय्य सल्लागार संस्था (Consultancy Firm) सुक्ष्म अन्न व्यवसायासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती,  नामांकित विद्यापीठ,  संस्था यांचेकडील अन्न तंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी,  कृषि अभियांत्रिकी मधील पदविका , पदवीधारक कृषि व कृषि संबंधीत पदवी, पदविधारक इतर कोणत्याही शाखेतील पदविका, पदविधारक किंवा सी.ए. पदवी असावी.

        अनुभव- वरील सर्वांना अन्न व कृषि प्रक्रिया उद्योगांना सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनविणे तसेच बँकेशी पाठपूरावा करुन कर्ज मंजूर करुन घेणे याबाबत अनुभव असणे आवश्यक आहे.

            या पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक-04 जूलै 2022 राहिल. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता परिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयात उपलब्ध्‍  आहेत. तसेच कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in  यावर सुध्दा उपलब्ध आहेत.

                                                      000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु