सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशासाठीचे आवाहन

 

*सामाजिक न्याय विभागाच्या*

*शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशासाठीचे आवाहन*

              *लातूर,दि.29 (जिमाका):-* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत कार्यरत मागासवर्गीय मुलां-मुलींची शासकीय वसतिगृहाकरीता शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षाकरीता रिक्त असलेल्या जागेवर लातूर याठिकाणी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी शालेय विद्यार्थी यांना दिनांक 15 जूलै 2022 कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थी यांना दिनांक 30 जूलै 2022 वरिष्ठ महाविद्यालय (बिगर व्यावसायीक अभ्यासक्रम) विद्यार्थी यांना दिनांक 24 ऑगस्ट 2022 वरिष्ठ महाविद्यालय (व्यावसायिक अभ्यासक्रम) विद्यार्थी यांना दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

       प्रवेशासाठी अर्ज शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांचेकउे उपलब्ध्‍ आहेत.सदर प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज भरुन संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांचेकडे सादर करावेत असे आवाहन गृहपाल, मुलांचे शासकीय वसतिगृह (जूने) लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                           000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु