नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी डिबीटी पोर्टलवर नोंदणी करावी -कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन*

 

*नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यासाठी*

*शेतकऱ्यांनी डिबीटी पोर्टलवर नोंदणी करावी*

                                  *-कृषि विभागाचे  शेतकऱ्यांना आवाहन*

 

        *लातूर,दि.3(जिमाका):-* जिल्हातील कृषि विभागांतर्गत महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प   जिल्ह्यातील हवामान बदलामूळे उदभवलेल्या परिस्थितीशी जूळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करणे, शेतक-यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने जिल्ह्यातील 282 गावांमध्ये सन 2018-19 पासून अंमलबजावणी सूरू आहे. प्रकल्पाअंतर्गत वैयक्तीक लाभाचे घटक फळबाग लागवड, बांबू लागवड, वृक्ष लागवड, हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन, रेशीम उदयोग, मधूमक्षिका पालन, नाडेप/गांडूळ खत युनिट, विहिर पुर्नभरण, गोडया पाण्यातील मत्स्य पालन, परसबागेतील कुक्कुटपालन,  वैयक्तिक शेततळे (इनलेट व आऊटलेटसह/अस्तरीकरणासह), शेततळे अस्तरीकरण, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, शेडनेट हाऊस, पॉलिहाऊस/पॉलिटनेल इत्यादी वैयक्तीक घटकांची अंमलबजावणी चालू आहे.  

जिल्हयामध्ये प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करिता वरील नमुद केलेल्या घटकांचा लाभ घेण्याकरीता लाभ घेण्यासाठी इच्छूक असलेल्या शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर (https://dbt.mahapocra.gov.in)ú नोंदणी करावी. नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये संबंधीत शेतक-यांचे आधारकार्ड, 7/12 उतारा, व 8-अ, मोबाईल क्रमांक, अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र, अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ठ प्रत्येक बाबीकरीता स्वतंत्र अर्ज करावा. अधिक माहीतीसाठी प्रकल्पात समाविष्ठ गावातील संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, डि. एस. गावसाने यांनी केले आहे.

                                            0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु