आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यातील 2 हजार 727 विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग होणार
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
जिल्ह्यातील 2 हजार 727 विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग
होणार
*लातूर,दि.20 (जिमाका):-* जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांच्या सुचनेनुसार शिक्षण जिल्हा परिषदेच्या विभाग माध्यमिक लातूर
यांच्यातंर्गत आज लातूर जिल्ह्यातील सर्व
शाळांमध्ये योगाचे सादरीकरण होणार आहे. साधारणपणे 75 शाळांमध्ये प्रत्येकी 1 हजार विद्यार्थ्यांची
प्रभातफेरी टाऊन हॉल ते क्रीडा संकूल अशी काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या
सहभागाने अमृत महोत्सवानिमित्त 7 हजार 500 विद्यार्थ्यांच्या योगा सादरीकरणाचा भव्य
कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
आतंराष्ट्रीय योग
दिनानिमित्त सर्व 2 हजार 727 शाळेतील सर्व शिक्षण व विद्यार्थ्यांचा सहभाग असणार
आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागेश मापारी यांनी एका
प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment