फळ लागवडीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
*फळ लागवडीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन*
*लातूर, दि.28 (जिमाका):-* महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन 2022-23 साठी अर्ज
करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
केले आहे.
फळबाग लागवडीची मुदत दि. 31 डिसेंबर पर्येत
आहे. वैयक्तीक शेतकरी, वैयक्तीक बांधावर लागवड फळपिके, वनीकरण, फुलझाडे यात आंबा, चिकु,
पेरु, डाळींब, लिंबु, संत्री, सीताफळ, ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष आदी वैयक्तीक
शेतकरी पडीक जमीनीवर लागवड यात आंबा, बोर, नारळ, सिताफळ आदी फुलझाडे लागवडीत गुलाब,
मोगरा, निशिगंध यांचा लागवडीमध्ये समावेश होतो. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर
कमी जास्त करण्याची परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपिक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारशीनुसार
अंतर मर्यादीतच देय राहील. अतिरिक्त कलमे / रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही.
लागवड वर्षासह सलग तीन वर्षात मंजुर अंदाजपत्रकानुसार
अनुदान देय राहील. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती वृक्ष पिकांबाबत जे लाभार्थी कमीत
कमी 90 टक्के आणि कोरडवाहू वृक्षपिकांबाबत किमान 75 टक्के रोपे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना
दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. अनुदान पात्र पिके पूढील प्रमाणे आहेत.
फळपिके :- ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष, आंबा, चिकु, पेरु,डाळींब, संत्री,
सिताफळ,कागदी लिंबू, मोसंबी, आवळा, कवठ, जांभूळ, नारळ,चिंच, फणस, अंजीर, पानपिंपरी,
शेवगा व काजू, फुलपिके :- गुलाब, मोगरा व निशिगंध. बांधावर वृक्ष लागवडही शक्य :- वैयक्तीक
बांधावरील वृक्षलागवडही अनुदानपात्र आहे. हेक्टरी 20 रोपे मर्यादीत ही योजना राबविण्यात
येते. बांधावर लागवडीमध्ये विभागानुसार सर्व फळपिकांचा (पपई सोडून) समावेश आहे.
लाभार्थीचे निकष :- कमीत कमी 0.05 हेक्टर
व जास्तीत जास्त 2 हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा, इच्छुक लाभधारकांच्या नावे
जमीन असणे आवश्यक, सातबारा कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक, अल्प व अत्यल्प
लाभार्थी, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य व अनुसूचित जाती, जमाती,
भटक्या जमाती, दारिद्र रेषेखालील व्यक्तींना प्राधान्य.
0000
Comments
Post a Comment