बाल कामगारांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती अभियान
बाल कामगारांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात
आणण्यासाठी जनजागृती अभियान
*लातूर,दि.13 (जिमाका):-* दि.12 जून आंतरराष्ट्रीय
बाल मजुरी विरोधी दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातुन बाल मजुरी या प्रथेचे समुळ
उचाटन करुन बाल मजुरांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात समाविष्ठ करुन घेणे त्यांचे व आवश्यकता
असल्यास त्यांचे कुटुंबाचे पुर्नवसन करणे बाल मजुरांची मालकांच्या तावडीतुन मुक्तता
करण्याच्या उद्देशाने बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियान सहाय्यक कामगार आयुक्त
कार्यालय, लातूर कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.
बाल किशोन वयीन कामगार (प्रतिबंध
व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात / प्रक्रियेत
कामावर ठेवणे तसेच 14 वर्ष पूर्ण परंतु 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किशोर वयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये
कामावर ठेवणे गुन्हा आहे व जर मालकाने / नियोक्त्याने बाल अथवा किशोर वयीन मुलांना
कामावर ठेवल्यास त्यांस 6 महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा रु. 20 हजार ते
50 हजार पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होवु शकतात अशी तरतुद आहे.
लातूर जिल्ह्यातील तमाम नागरिक
/ व्यापारी / उद्योजक यांना आवाहन करण्यात येते की बाल कामगार कामावर ठेवण्यात येवू
नये.व बाल कामगार आढळून आल्यास कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक
कामगार आयुक्त लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment