तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

 

तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी

अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

           *लातूर,दि.8,(जिमाका):-* सामाजिक न्‍याय व अधिकारीता मंत्रालय,  भारत सरकार, नवी दिल्‍ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्‍यक्‍तींसाठी https:transgender.dosje.gov.in  हे राष्‍ट्रीय पोर्टल सुरु करण्‍यात आलेले आहे.  या पोर्टलवर तृतीयपंथी व्‍यक्‍तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्‍याबाबतची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. 

            राज्‍यातील तृतीयपंथीय व्‍यक्‍तींची निश्‍चीत आकडेवारी उपलब्‍ध नसल्‍याने त्‍यांच्यासाठी नाविन्‍यपूर्ण व कौशल्‍य विकासाच्‍या योजना राबविण्‍यास अडचणी निर्माण होत आहे.  त्‍यासाठी तृतीयपंथीय व्‍यक्‍तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी एकदिवसी शिबीराचे आयोजन दिनांक 9 जून 2022 रोजी सामाजिक न्‍याय भवन, आडत लाईन, शिवनेरी गेट च्‍या समोर,  लातूर येथे करण्‍यात येणार आहे.                   

            लातूर जिल्‍ह्यातील ज्‍या तृतीयपंथीयांनी https:transgender.dosje.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली नाही, अशा  तृतीयपंथी समुदायातील व्‍यक्‍तींनी आपल्या कागदपत्रांसह (आधारकार्ड झेरॉक्‍स प्रत, पासपोर्ट साईज फोटो, 100 रु. बॅंड पेपर) सह सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग, आडत लाईन, शिवनेरी गेट च्‍या समोर लातूर या ठिकाणी उपस्थित राहावे, म्‍हणजे त्‍यांना तृतीयपंथी असल्या बाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. अधिक माहितीसाठी  या कार्यालयातील संदेश घुगे ( समाज कल्‍याण निरीक्षक) (9405446216) व शिवाजी पांढरे  (‍ कनिष्‍ठ लिपीक ) (9823768188)  यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्‍त समाज कल्‍याण यांनी केले आहे.

                                                   000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु