जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय ‘सांख्यिकी दिन ’ उत्साहात साजरा

 

जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने

राष्ट्रीय ‘सांख्यिकी दिन ’ उत्साहात साजरा

 

*लातूर,दि.30(जिमाका)-* स्वातंत्रोत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्रा.प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपुर्ण योगदाना बददल त्यांचा जन्मदिन 29 जून” हा दिवस दरवर्षी सांख्यिकी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन 2007 पासुन केंद्र शासनाने घेतलेला आहे. सांख्यिकी दिनाचा मुख्य उददेश सामाजिक व आर्थिक नियोजन आणि धोरणांची आखणी यामधील सांख्यिकीचे महत्व व त्या अनुषंगाने स्व.प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या कार्यातुन जनतेमध्ये विशेषत: युवा पिढीमध्ये जाणीव व जागृती निर्माण व्हावी, त्यांनी प्रेरणा घ्यावी, असे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रतिपादन केले.

बुधवार, दिनांक 29 जून, 2022 रोजी दुपारी २.३० वाजता राष्‍ट्रीय सांख्यिकी दिनाचा कार्यक्रम जिल्हा सांख्यिकी कार्यालय, लातूर येथे साजरा करण्यांत आला. यावर्षी सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकल्पना म्हणून विचार व्यक्त करण्यासाठी (Data For Sustainable Development) हा विषय ठेवण्यांत आलेला होता.

याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे जिल्‍हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सांख्यिकीचे महत्‍व विषद करतांना कौटील्‍याचे अर्थशास्‍त्राचे महत्व विशद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पगारी नोकऱ्या व पेन्‍शन योजना सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुलकी प्रशासन व्यवस्था प्रबळ करण्यावर अधिक भर दिला. तसेच अष्‍टप्रधान मंडळाद्वारे युध्‍दनितीचे नियोजन व त्‍यासाठी आवश्‍यक साधन सामग्री इ. करिता अत्यंत नियोजनपूर्वक अर्थ नितीचा वापर केला जात असे त्‍यामुळे विकास कामामध्‍ये संख्‍याशास्‍त्राचे अनन्‍य साधारण महत्‍व असल्‍याचे नमुद केले.

या कायक्रमाचे अध्‍यक्ष संशाधन अधिकारी श्रीमती प्रियंका बोकील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्‍था पूणे यांनी शाश्‍वत विकास ध्‍येयाबाबत सविस्‍तर माहिती दिली. यावेळी शाश्‍वत विकासाचे १७ उद्दीष्‍ट व १६९ लक्ष २०३० पर्यंत साध्‍य करण्‍याचे शासनाचे धोरण असल्‍याचे नमुद केले. तसेच सध्‍याच्‍या योजना व उद्दीष्‍टे यांची सांगड योग्‍य रितीने घालून कार्य केल्‍यास हे ध्‍येय साध्‍य करता येऊ शकते असे नमुद केले. विकासाचे ध्‍येय साध्‍य करत असतांना वर्तमान पिढीच्‍या गरजा पूर्ण करणे व त्‍यासोबतच भविष्यातील पिढीच्‍या गरजांना बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे.

            हा कार्यक्रम यशस्‍वी होण्यासाठी जिल्‍हा सांख्यिकी कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी संतोष पां. बोदडे, सांख्यिकी सहायक श्री विजय दुधभाते, शशीकांत स्‍वामी, अ.बा.चव्‍हाण, श्रीमती श्रीदेवी पाटील, श्रीमती वर्षा शिंदे व वैभव करवर यांनी विशेष परिश्रम घेतले .

 तसेच या कार्यक्रमास जिल्‍हा नियोजन समिती कार्यालयातील  श्री जाधव वा.प्र., सहायक जिल्‍हा नियोजन अधिकारी , श्री कडेकर, लेखाधिकारी,  संशोधन सहायक संजय कलशेट्टी, विजय परभणकर, रविकांत काळे, सांख्यिकी सहायक श्री. हलगे, विशाल नेवासकर, महेश कुलकर्णी, जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील संशोधन सहायक उमाकांत हत्‍ते, सांख्यिकी सहायक व गोवींद गुट्टे व जिल्‍हा उपनिबंधक कार्यालय लातूर येथील सांख्यिकी सहायक नागरगोजे तसेच आरोग्‍य विभागातील सांख्यिकी विभागाचे कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.





****

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा