भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा अभिकर्ता या पदासाठी थेट मुलाखतीव्दारे मेगा भरती

 

भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा

अभिकर्ता या पदासाठी थेट मुलाखतीव्दारे मेगा भरती

§  4 जूलै रोजी शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन*

*लातूर,दि.16(जिमाका):-* भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजने अंतर्गत थेट मुलाखतीव्दारे अभिकर्त्यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यासाठी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक 4 जूलै 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत डाक अधीक्षक कार्यालय, दुसरा मजला मुख्य पोस्ट ऑफिस लातूर या ठिकाणी  दहावी व बारावी च्या शैक्षणिक कागदपत्रासह व 3 फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड सहित मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित रहावे असे आवाहन अधिक्षक डाकघर उस्मानाबाद विभाग, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

पात्रता व अटी पूढील प्रमाणे आहे. वय मर्यादा वय वर्ष 18 ते 50 वर्ष, शैक्षणिक अहर्ता- उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. श्रेणी- बेरोजगार, स्वयं रोजगार, माजी जीवन विमा सल्लागार, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडल कर्मचारी इत्यादी कोणीही अर्ज करु शकता.उमेदवाराची निवड थेट मुलाखतीव्दारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संवाद कौशल्य, जीवन विमा बाबत ज्ञान या आधारावर केली जाईल.

निवड झालेल्या उमेदवाराकडून  NSC  अथवा KVP च्या स्वरुपात रु. 5 हजार सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपाचा परवाना देण्यात येईल. नंतर IRDA ची परीक्षा पास केल्यानंतर उमेदवार कायम करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना डाक विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन दिले जाईल असे ही पत्रकात नमुद केले आहे.

 

                                        0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु