लातूर न्यायालयात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शिबीर संपन्न

 लातूर न्यायालयात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शिबीर संपन्न

 

        लातूर,दि.21,(जिमाका):-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानूसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व विधीज्ञ मंडळ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील न्यायालय परिसरामध्ये आंतर राष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग शिबीराचे आयोजन करण्यात आले.

      सकाळी ठिक 7 वाजता जिल्हा न्यायालयामधील परिसरामध्ये योग प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यानिमित्त योगशिक्षक ॲड. जे.पी. चिताडे यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. तसेच योगशिक्षकांनी दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्व किती आहे हे समजुन सांगितले. योग शिबीरास न्यायाधीश विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी, विधीज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. योगशिक्षक जे.पी. चिताडे यांनी दैनंदिन आयुष्यात योगाचे महत्व सांगितले.



                                                  

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन