जिल्ह्यातील तीन रासायनिक खत विक्रेता केंद्राचे परवाने निलंबित

 

जिल्ह्यातील तीन रासायनिक

खत विक्रेता केंद्राचे परवाने निलंबित

 

   *लातूर,दि.8,(जिमाका):-*खरीप हंगाम 2022 मधे शेतकऱ्यांना वेळेत खत पुरवठा होण्याच्या दृष्टीने संचालक (नि व गु नी ) कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पोर्टलवरील यादीप्रमाणे अनुदानित रासायानिक खताचा जास्तीचा साठा असलेल्या ई- पॉद्वारे विक्री करणाऱ्या दुकानाची तपासणी करण्यात आली होती.

त्याअनुषंगाने खत निरीक्षकामार्फत या दुकानाची तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान खरेदीदारास आपण जास्तीचा युरिया खताची विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खताचा साठा व भावफलक अद्यावत नाही, साठा नोंदवही अद्यावत नाही. दुकानात/ गोदामात डीएपी खत उपलब्ध असून सुद्धा साठा व भाव फलकावर दर्शविलेला नाही, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा घेत नाही, डीएपी खतासोबत इतर खत नसलेल्या वस्तूंची लिंकिंग करून विक्री होत आहे . यावरून सदर विक्रेत्यांनी खत नियंत्रण आदेश 1985 चे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्याअनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी घेऊन जास्तीची तफावत आढळून आलेल्या दुकानाचे खत परवाने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी निलंबित केलेले आहेत. यामधे मे. झुंजारे कृषी सेवा केंद्र, मांजरी, ता- लातूर जिल्हा- लातूर , मे. भैरवनाथ कृषी सेवा केंद्र, पिंपळगाव, ता- लातूर जिल्हा- लातूर, मे. कारंजे कृषी सेवा केंद्र, शाखा क्र- 1, गुळ मार्केट, कव्हा रोड, लातूर यांचा समावेश आहे.

           या पुढे खत विक्री केंद्रावर ई-पॉसवरील साठा, प्रत्यक्षात साठा व साठा नोंदवही तील साठा यामध्ये तफावत आढळून आल्यास तसेच खताचा भावफलक, साठा नोंदवही अद्यावत नसल्यास,  बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा घेत नसल्यास व खतासोबत इतर खताची लिंकिंग केल्यास आपणावर  खत नियंत्रण आदेश 1985 नुसार कडक कार्यवाही करण्याचा इशारा परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी दिला आहे.

 

                                                    000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु