लातूर जिल्हा क्रीडा संकुल मंगळवारी सकाळी " आरोग्यदायी" झाले

हजारो लोकांनी गिरवले योगाचे धडे

§  जागतिक योग दिनी जिल्ह्यात हजारो लोकांनी  सामुदायिक योग करून साजरा केला  आंतरराष्ट्रीय योग दिन

§  जिल्हाधिकारी यांच्या सह अनेक अधिकारी, संस्थाचे पदाधिकारी यांनी केली योगासने

      


लातूर,दि.21(जिमाका)-
लातूर जिल्हा क्रीडा संकुलात रोज लोकांचा व्यायामाचा राबता असतो, मात्र मंगळवारी सकाळी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून हजारो ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिक्षक,एनसीसी कैडेट्स, स्काउट वोलंटियर्स, अधिकारी, कर्मचारी यांनी योगाचे धडे गिरवले.

           जिल्हा प्रशासनाच्या वतीने नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर मानपा,पुलिस विभाग, प्रजापिता ब्रम्हकुमारी, शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

            



यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, नेहरू युवा केंद्राच्या जिला युवा अधिकारी साक्षी समैया, प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या पदाधिकारी, आयुष विभागाचे अधिकारी, सुप्रभात ग्रुप, अनेक सामाजिक संस्थाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

             सकाळी लातूर शहरातील 22 शाळेच्या विद्यार्थि,स्काऊट विद्यार्थी,एन.सी.सी. विद्यार्थी,पोलीस विभाग यांच्या सहभागाने प्रभात फेरी झाली. त्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. योग हा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त गोष्ट असून.. योगा हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा झाला तर अनेक व्याधी होण्यापासून किंवा झालेल्या व्याधीपासून मुक्तता होण्याचा हा अत्यंत परिणामकारक मार्ग असल्याचे योगगुरूंनी सांगितले.

जिल्ह्यात अडीच हजार शाळांमध्ये साजरा झाला योग दिवस

            जिल्ह्यातील 2500 सर्व शाळांमध्ये सकाळी जागतिक योग दिनानिमित्त योगा घेण्यात आला. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 शाळातील प्रत्येकी एक हजार विद्यार्थ्यांनी योग करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

         मा.जिल्हाधिकारी  बी.पृथ्वीराज  यांनी  योगदिनाच्या   शुभेच्छा देऊन नित्य योगाभ्यास करण्याचे आवाहन केले .योग प्रात्यक्षिक  विष्णू  भूतडा  यानी  स्वतः सादर करून  उपस्थितांकडून  करून  घेतले   ,आभार प्रदर्शन जिल्हा  क्रिडाधिकारी जगन्नाथ लकडे  यांनी  व सूत्रसंचालन जिल्हा आयूष अधिकारी  डॉ. विकास पाटील  यांनी  केले.

            जिल्ह्य़ातील  सर्व  आरोग्य  संस्थामध्ये  जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. देशमुख    जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. वडगावे  यांच्या सूचनेनुसार  आंतरराष्ट्रीय योग दिवस  साजरा  करण्यात  आला.

****

 


 

 

 


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु