कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी शासकीय आय. टी. आय. देवणी येथे प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

 

कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी

शासकीय आय. टी. आय. देवणी येथे प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

 

          लातूर,दि.21 (जिमाका)-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर योजनेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी 17 जुन 2022 पासुन प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. या साठी दहावीत मिळालेल्या गुणाच्या अधारे केंद्रीय ऑनलाईन प्रणाली द्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश अर्ज निश्चिती व स्वीकृत केंद्र असतील. अर्ज स्वीकृती केंद्रात अर्ज भरणे, पडताळणी, स्विकृती निश्चिती करता यईल.

          ऑनलाईन अर्ज शुल्क राखीव प्रर्वगासाठी 100 रुपये तर खुल्या प्रर्वगासाठी 150 रुपये आहे. प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.admission.dvet.gov.in  www.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट दयावी. प्रवेशासंबधीचे नियम, आवश्यक दस्ताऐवजाची माहिती व प्रवेश कार्य पध्दती या बाबत. विस्तृत माहिती समाविष्ठ असलेली माहिती पुस्तीका प्रवेश संकेतस्थळावर (DOWNLOAD SECTION) (डाऊनलोड सेक्शन) मध्ये उपलब्ध आहे.

          शासकीय आय. टी. आय. देवणी येथे एकुण  सात व्यवसायाचे प्रवेश उपलब्ध आहेत. दोन वर्ष कालावधीचे व्यवसाय:-(फिटर),(पेंटर),(जनरल), (इलेक्ट्रॉनिक मशीन), (इलेक्ट्रीयन), (आयसीटीएसएम), Fitter, Painter General, Electronics. Mechanic, Electrician, ICTSM आणि  एक वर्ष कालावधीचे व्यवसाय :- (Dress Making, Copa) (डेस मेकींग कोपा) उपलब्ध आहेत.

 

                                                      0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु