केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा दिव्य गौरव सोहळा संपन्न

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतील

गुणवंताचा दिव्य गौरव सोहळा संपन्न

स्पर्धा परीक्षेतील यश हे तुमच्या मेहनतीच फळ असतं, बाकी सगळे योगायोग असतात...!!                                                                                                       

                                                                 - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

या वर्षीच्या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतले

आई वडिलांच्या समवेत गौरव करतांना ' हेचि फळ मम तपाला " अशी भावना पालकांची

           लातूर दि.16 (जिमाका)

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन शुभम भोसले आणि  रामेश्वर सब्बनवाड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत मिळवलेलं यश हे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे ठरेल... जिल्हा परिषदेची शाळा गुणवत्तेत कुठेही कमी नाही याचही हे उदाहरण आहे. स्पर्धा परीक्षेतील यश हे तुमच्या मेहनतीच फळ असतं... बाहेरून कितीही ज्ञान मिळालं तरी त्याचा काही उपयोग होत नाही जो पर्यंत ते आतून येत नाही तो पर्यंत तुमच्या स्वप्नातल्या यशाला गाठता येत नाही असं प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले.

               बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या स्पर्धा परीक्षेतील लातूर जिल्ह्यातील यशस्वी गुणवंताचा गौरव जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.

                जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, गेल्या वर्षी ज्यांनी हे यश संपादन केलं आणि सध्या आय ए एस चे प्रशिक्षण घेत आहेत ते विनायक महामुनी, कमलकिशोर कंडारकर, ज्यांचा माता पित्यासह गौरव झाला ते शुभम भोसले, रामेश्वर सबनवाड यावेळी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सगळ्यात महत्वाचे आहे तुमची इच्छा शक्ती, त्यानंतर अभ्यासाला लगणारी पुस्तकं, त्यातली पहिली गोष्ट मनाची इच्छा शक्ती जी सर्वस्वी तुमच्याशी निगडित आहे. दुसरी बाब पुस्तकं आणि अभ्यासिका बाबतीत जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रातील मंडळींना बोलावून त्यांचे व्याख्यान चर्चासत्र ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिल असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.यावेळी त्यांनी यशस्वी झालेल्या दोघांच्या पालकांचेही मनस्वी अभिनंदन केले.

           स्पर्धा परीक्षेतील दोन्ही विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेतून झाल्यामुळे आणि मी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यामुळे माझ्या घरातल्या दोन गुणी जणांचा सत्कार करतोय अशी हृद भावना असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून दोघांचे अभिनंदन केले.

               शुभम भोसले आणि रामेश्वर सबनवाड यांनी आपल्या यशाच्या वाटा.. यशोशिखरापर्यंत कशा गेल्या हे सविस्तर सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षेविषयी असलेले प्रश्न, त्यांच्या शंका यावरही त्यांचे समाधान होईल असे उत्तर दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी केले. तर आभार जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी ग्रंथपाल पांडुरंग अडसुळे, जिल्हा ग्रंथालयाचे कर्मचारी, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.








 

                                            

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु