गोवा निर्मित अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 6 लाख 80 हजाराचा मुद्येमाल जप्त

 

गोवा निर्मित अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 6 लाख 80 हजाराचा मुद्येमाल जप्त

*लातूर,दि.21,(जिमाका):-* राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या आदेशानुसार व विभागीय उप-आयुक्त प्रदिप एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील अधीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, लातूर यांच्या स्टाफने  उड्डाण पूलाजवळ, बार्शी रोड लातूर या  ठिकाणी दिनांक 20 जून 2022 रोजी एक दुचाकी ॲक्टीव्हा स्कुटी क्र. MH-24-W-2232 वर अवैध वाहतूक करित असतांना 2 बॉक्स गोवा निर्मिती विदेशी मद्य जप्त करण्यात आले, पकडलेल्या आरोपींना चौकशी केली असता सदर अवैध मद्य मे. हॉटेल अजिंक्यतारा येथे घेवून चालल्याच्या सांगण्यावरुन सदर हॉटेलवर छाप टाकला असता या ठिकाणी एकूण 13 बॉक्स गोवाराज्य निर्मित विदेशी मद्य आढळूण आले.  

त्या गुन्ह्याच्या पुढील तपासात आरोपींच्या सांगण्यावरुन बसवंतनगर, जि. लातूर येथे मद्येमाल लपविल्याचे कळल्यावरुन तेथे राहते जागेत छापा टाकला असता त्या ठिकाणी 50 बॉक्स गोवा राज्य निर्मित अवैध मद्य तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक मारुती व्हॅन क्र.                MH-26-L-760 जप्त करण्यात आली.  त्याच गुन्ह्याच्या तपासात मौ. बोरगांव काळे, ता. जि. लातूर येथील एका शेतात छापा मारला असता त्या ठिकाणी 20 बॉक्स गोवा राज्य निर्मित अवैध विदेशी मद्य मिळूण आले तसेच एका आरोपीच्या घरी म्हाडा कॉलनी, लातूर, ता. जि. लातूर येथे 10 बॉक्स गोवा राज्य निर्मित अवैध मद्य तसेच गुन्ह्यात वापरलेली एक होंडा शाईन दुचाकी क्र. MH-24-AK-1347 जप्त करण्यात आले. सर्व मिळूण एकूण 95 बॉक्स गोवा राज्य निर्मित अवैध मद्य तसेच वरील नमुद एक चारचाकी व दोन दुचाकी वाहन जप्त करण्यात आले.

 त्यापैकी गोवा बनावटीच्या जप्त अवैध विदेशी मद्याची  किंमत रु. 4 लाख 90 हजार 40 व गुन्ह़यात वापरलेल्या जप्त वाहनाची किंमत रु. 1 लाख 90 हजार  बाटली, बुचे, बॉक्स असे साहित्य असा एकूण 6 लाख 80 हजार 40 रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त करण्यात आला. गुन्हा क्र. 120/2022 दि. 20 जून 2022 अन्वये (1)महेश भागवत शिंदे, रा. सिताराम नगर, लातूर (2) दिनेश रामकिशन शिंदे, रा. सिताराम नगर, लातूर (3) योगेश आत्माराम सांडवे, रा. साई रोड, लातूर (4) जयराम आश्रुबा पांडे, रा. बसवंतपुर, जि. लातूर (5) अनिल हणमंत जाधव, रा. बोरगांव बु, ता. जि. लातूर (6) सोमनाथ नारायण पकाले, रा. कोल्हे  नगर, लातूर या आरोपींना अटक करण्यात आली, यामध्ये बब्रुवान रामराव सुर्यवंशी हा आरोपी फरार आहे.

या  कारवाईमध्ये अधीक्षक- अभिजित देशमुख, लातूर निरीक्षक आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक  गणेश गोले, जवान  अनिरुद्व देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे, श्रीकांत एस. साळुंके यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास निरीक्षक- आर. एम. बांगर हे

करीत आहेत.

अवैध मद्यविक्री विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 8422001133 क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे  अभिजित देशमुख, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी



सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.


                                                                 0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा