मौजे भिसे वाघोली येथे अटल भूजल (अटल जल) अंतर्गत्‍ शेतकरी मेळावा संपन्न

 

मौजे भिसे वाघोली येथे अटल भूजल

(अटल जल) अंतर्गत्‍ शेतकरी मेळावा संपन्न

           

     लातूर,दि.17(जिमाका)- केंद्र सरकार व जागतिक बॅक पुरस्कृत अटल भूजल योजनेअंतर्गत आज दिनांक 17.06.2022 रोजी मौजे भिसे वाघोली ता. जि. लातूर येथे अटल भूजल (अटल जल) योजने अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

           सदर मेळाव्याला श्री. सुधीर जैन कनिष्ठ भूवैज्ञानिक व श्री नंदकिशोर कचाटे भूवैज्ञानिक, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, आयुक्त कार्यालय, पुणे यांनी शेतकरी मेळाव्याला उपस्थिती राहून शेतकऱ्यांना पाणी बचतीविषयी मार्गदर्शन केले तसेच जलसुरक्षा आराखडा अदयावत करणे, विहीर सर्वेक्षण, नाला सर्वेक्षण, शेत सर्वेक्षण, निरीक्षण विहीर ची निवड, पाणी नमुने, या विषयी माहिती दिली.

          वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. एस.बी.गायकवाड, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, लातूर यांनी अटल भूजल योजनेतून घेण्यात येणारी पाणलोटाची विविध कामे, पिक पध्दतीमध्ये बदल करुन  शेतकऱ्यांनी फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, दुग्धव्यसाय, कुकुटपालन व्यवसाय केल्यास पाण्याची बचत होईल.

         तसेच शेतकऱ्यांनी ठिंबक /तुषार सिंचन पध्दतीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या MAHADBT याप्रणालीवर आपले अर्ज सादर करावेत जेणे करुन अटल भूजल योजनेत समाविष्ठ गावांतील सर्व शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदानाचा लाभ होणार आहे. यामूळे पाण्याची बचत होउन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

या वेळी भिसे वाघोली येथील पाटील रणजीत राजेसाहेब- विकास स.कारखाना संचालक, पठाण हमीद, भिसे बाळासाहेब, मांदळे बाळासाहेब,ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष पाटील आप्पाराव वि.वि.कार्यकारी संस्था, उपाध्यक्ष पाटील हनूमंत, पोलीस पाटील श्री. दिक्षीत सुरेश, ह.भ.प. भिसे शिवाजी, ग्रामसेवक सोमवंशी, कृषि सहाय्यक घाडगे मॉडम व सर्व ग्रामस्थ भिसे वाघोली या शेतकरी मेळाव्याला मोठया संख्याने उपस्थित होते.

 या शेतकरी मेळाव्याला जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे एच.आर. नाईक संवाद तज्ञ, ए.सी.पटारे भूजल तज्ञ, बी.एम.गोरपल्ले कृषि तज्ञ, आर.एम.पठाण संगणक परिचालक व जिल्हा भागीदार अंमलबजावणी संस्थेचे तज्ञ व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

                                                    000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा