आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपुर्ण जिल्ह्यात योगाभ्यासाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात यावे

 

आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपुर्ण जिल्ह्यात योगाभ्यासाचे

आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात यावे

                                                                           -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

          लातूर,दि.17(जिमाका):- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार मार्फत प्राप्त निर्देशाप्रमाणे, जिल्हा प्रशासन , जिल्हा क्रीडा कार्यालय ,नेहरु युवा केंद्र व आयुष विभाग लातूर संयुक्त विद्यमाने, 21 जून 2022 रोजी 8 वा आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपुर्ण जिल्हाभरात विविध पातळीवर योगअभ्यासाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपन्न होत असलेल्या या योग दिनास विशेष महत्व असून मानवतेसाठी योग ही मुख्य थीम या वर्षीच्या कार्यक्रमाची असेल.

            कार्यक्रमाच्या नियोजनास्तव जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.या बैठकीत पतंजली योग पिठ, ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय, योग क्षेत्रात कार्यरत विविध संस्था चे प्रतिनिधी पोलीस विभाग लातूर, पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर, महानगरपालिका लातूर, शिक्षण विभाग लातूर, जिल्हा परिषद,लातूर एन.सी.सी., स्काउट गाईड, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आयुष आदी विभागाचे अधिकारी तसेच विविध महाविद्यालयाचे प्रतिनिधी मोठया प्रमाणे उपस्थित होते. विविध शासकीय विभाग व समाजिक, संस्थेच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नियोजन करण्यात आले.

             लातूर शहरामध्ये योग दिनाची सुरुवात सकाळी ६:००वाजता प्रभातफेरी काढून करण्यात येईल.ती टाऊन हॉल ते शिवाजी चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुलापर्यंत येईल.  जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे दिना 06.30 पासून सुरू होईल. त्यानंतर ठीक 7.00 वाजता आयुष मंत्रालयाच्या कॉमन योगा प्रोटोकॉल नुसार योगभ्यास करण्यात येईल.

            यामध्ये पोलीस विभाग,एन.सी.सी.स्काऊट गाईड विद्यार्थी,विविध शाळांचे विद्यार्थी,शिक्षक,क्रीडा शिक्षक खेळाडू, कोचेस, शासकीय अधिकारी,कर्मचारी हे साधारणतः 7500 एवढ्या संख्येने उपस्थित रहाणे अपेक्षित आहे.

           याच दिवशी जिल्ह्यामधील विविध 75 शाळांमध्ये ,तसेच ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्र च्या साहाय्याने 75 गावामध्ये योगाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय , आरोग्यवर्धनी केंद्र,या सर्व आरोग्य संस्था मध्ये योग दिवस साजरा होत आहे.यामध्ये स्थानिक नागरिक सहभाग घेऊ शकतात.

या योग दिनाचे आयोजन जिल्हा प्रशासन लातूर,यांच्या वतीने करण्यात येत आहे.

        आयुक्त कार्यालय म.न.पा.लातूर,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा आयुष विभाग ,नेहरू युवा केंद्र , पोलीस विभाग ,शिक्षण विभाग इतर शासकीय विभाग व लातूर मधील सर्व योग संस्था सेवाभावी संस्था,यांचा यात सक्रिय सहभाग आहे.

      21 जून 2022 रोजी मी योग करणार आहे.आपण सर्वांनी परिवारासह योग करण्यात यावा.व इतरांनाही योगासाठी प्रोत्साहित करावे,असे मा. जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.

 

                                                       0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा