व्यायाम शाळा विकास अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

व्यायाम शाळा विकास अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

        *लातूर,दि.13 (जिमाका):-* व्यायामशाळा विकास अनुदान सन 8 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये पंजीबध्द संस्था, क्रिडा मंडळे, युवक मंडळे व महिला मंडळे म्हणजेच खाजगी संस्था अथवा मंडळे यांना अनुदान देता येत नाही. परंतू या योजना बाबतची नियमावली परिशिष्ट अ मधील नियम क्र. 3 अनुदानाच्या बाबी क्रं. 3 मध्ये जुन्या नियमानूसार बांधकाम पुर्ण झालेल्या व्यायामशाळा व वर उल्लेखित क्षेत्रफळाच्या नवीन व्यायामशाळांना अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा पुरवठा करणे असे नमुद केलेले आहे.

          या नियमांची धारणा पक्की करणेसाठी शासनास प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याअन्वये या पुर्वीच्या म्हणजेच दि. 22 जानेवारी 2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार व्यायामशाळा बांधकाम या बाबीसाठी व्दितीय किंवा अंतिम हप्ता देय असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील संस्थांची माहिती व व्यायामशाळा साहित्य देय असणाऱ्या संस्थांनी पूढील माहिती तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावी.

         अनुदान बाब, मंजुर अनुदान व संस्थेच नाव, अनुदान मंजुर झालेले आर्थिक वर्ष, एकुण मंजुर अनुदान व त्यानंतर दि. 22 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयाप्रमाणे बांधकाम पुर्ण झालेल्या व्यायामशाळा परंतू दि. 8 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये बदल झाल्यामुळे व्यायामशाळा बांधकाम पुर्ण होऊन सुध्दा व्यायाम साहित्य देता आलेले नाही. अशा संस्थेचे नाव व बांधकाम पुर्ण झालेला तपशील तसेच साहित्य मागणीचा तपशील अशी सर्व माहिती संबंधितांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर या कार्यालयात तात्काळ सादर करावी असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु