उमेदच्या वतीने दोन दिवसीय बँकर्स कार्यशाळेचे आयोजन
उमेदच्या वतीने दोन दिवसीय बँकर्स कार्यशाळेचे आयोजन
*लातूर,दि.22(जिमाका)-*महाराष्ट्र राज्य
ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष लातूर यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांची
दि.22 व 23 जून रोजी दोन दिवसीय बँकर्स कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव सभागृह जिल्हा परिषद
लातूर येथे करण्यात आले आहे.
सदर
कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी
अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कार्यशाळेस
प्रकल्प संचालक प्रभू जाधव यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यातील उमेद अंतर्गत कार्यरत
बचत गटांना कर्ज वितरण करताना निव्वळ कर्ज
वितरण न करता बचत गटांतील महिलांसोबत विश्वासहर्ता निर्माण करावी.
या
बरोबरच कर्ज वितरणाचे केवळ संख्यात्मक उद्दिष्ट साध्य न करता बँक कर्जाचा गुणात्मक विनियो ग कसा करता येईल या दृष्टिकोनातून
कर्ज वितरण करावे म्हणजे कर्जाची चांगली फलनिष्पत्ती
होईल याबाबत उपस्थित बँकर्स ना मुख्य कार्यकारी
अधिकारी अभिनव गोयल यांनी मार्गदर्शन केले.
बचत
गटाचे बँक खाते ओपन करणे व गटांना कर्ज वितरण सुलभ पद्धतीने होण्यासाठी सर्व बँकेत
आवश्यक कागदपत्राची यादी दर्शनी भागात लावण्यात यावी व महिन्यातील बँकेच्या सोयीप्रमाणे
किमान एक दिवस बचतगट कामासाठी देण्यात यावा
आशा सूचना उपस्थित मॅनेजर याना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.
याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक व्यस्थापक
कसबे यांनी उपस्थिती सर्व शाखा व्यवस्थापक यांनी सामाजिक बंधीलकीतून गटांना कर्ज वितरण
करून कर्ज वितरणामध्ये लातूर जिल्हा महाराष्ट्रात अग्रस्थानी यावा यासाठी सर्वानी प्रयन्त
करावे. तसेच 2022-23 या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे असे प्रतिपादन
केले.यावेळी कार्यशाळेसाठी राज्यस्तवरून उपस्थित असलेले प्रशिक्षक दीक्षित यांनी उमेद
अंतर्गत आर्थिक समावेशन पद्धती व बँकर्स च्या भूमिका व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर
मार्गदर्शन केले.
सन 2021-22 वर्षात निलंगा, औसा, लातूर व चाकूर तालुक्यातील बचत गटांना
कर्ज वितरणामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या व कर्ज वितरणामध्ये चांगले योगदान दिल्या बद्दल
मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी केले.तर
कार्यशाळचे यशस्वी नियोजन वैभव गुराळें जिल्हा व्यवस्थापक विपणन , सर्व तालुका अभियान व्यवस्थापक व तालुका व्यवस्थापक
आर्थिक समावेशन यांनीं केले.
Comments
Post a Comment